IND vs AUS 2nd ODI : ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी ‘400’ आव्हान, शुबमन- श्रेयसची शतकी ‘फोडणी’ तर सूर्याचा अर्धशतकी ‘तडका’

ind vs aus : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील वन डे सामन्यामध्ये कांगारूंच्या गोलंदाजांची भारताच्या युवा खेळाडूंनी दाणादाणा उडवून टाकली आहे. भारताच्या गोलंदाजांसमोर 400 धावा वाचवण्याचं आव्हान असणार आहे. श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांच्या शतकांच्या जोरावर भारताने डोंगरावएवढ लक्ष्य कांगारूंसमोर ठेवलं आहे.

IND vs AUS 2nd ODI : ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी '400' आव्हान, शुबमन- श्रेयसची शतकी 'फोडणी' तर सूर्याचा अर्धशतकी 'तडका'
Follow us
| Updated on: Sep 24, 2023 | 7:14 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या सामन्यात भारताच्या खेळाडूंनी कांगारूंचा भुगा केला आहे. 50 ओव्हरमध्ये भारताने 399 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी 400 धावांचं आव्हान दिलं आहे. यामध्ये भारताच्या शुबनम गिल आणि श्रेयस अय्यर यांती शतके त्यानंतर सूर्यकुमार यादवचं तुफानी अर्धशतकाच्या दमावर भारताने 400 धावांपर्यंत मजल मारली. आता कांगारूंना दुसरा सामना जिंकत मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग करायचा आहे.

भारताचा डाव 

भारताची सुरूवाता खराब झाली होती,  ऋतुराज गायकवाड स्वस्तात परतला त्यानंतर शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी द्विशतकी भागीदारी केली. त्यानंतर के. एल. राहुल आणि ईशान किशन यांनी 59 धावांची भागीदारी केली. त्यानंतर के.एल. सूर्याची 53 धावांची भागीदारी आणि शेवटला जडेजा आणि सूर्याने अवघ्या 26 बॉलमध्ये 44 धावा केल्या होत्या.

गायकवाड आऊट झाल्यावर श्रेयसने आक्रमक सुरूवात केली होती. गडी गॅपने चौकार मारत एकेरी दुहेरी धावा काढत होता. त्यापाठोपाठ शुबमन गिल यानेही आक्रमक पवित्रा घेतला, दोघांनीही कांगारूंच्या गोलंदाजांची सुपारी घेतल्यासारखी दोघेही फोडत होते. भारताकडून भारताकडून सर्वाधिक श्रेयस अय्यरने 90 बॉलमध्ये 105 धावा केल्या, यामध्ये 3 चौकार आणि 3 सिक्सर मारले. त्यापाठोपाठ शुबमन गिल याने सर्वाधिक 104 धावा केल्या. दोघेही बाद झाल्यावर राहुल आणि ईशान किशन यांनी धावगतीला एक्सलेटर दिला होता. मात्र जम्पाला मोठा फटका मारण्याच्या नादात तो 31 धावांवर बाद झाला.

सूर्यकुमार यादव याला मिस्टर 360 डिग्री का म्हणता हे दाखवून दिलं आहे. वन डे मध्ये पठ्ठ्याने टी-२० स्टाईल फलंदाजी केली. सलग चार सिक्सर मारले इतकंच नाहीतर त्याने अवघ्या 24 ब़ॉलमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात अर्धशतक करत विक्रम केला. कमी बॉलमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध अर्धशतक करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ (C), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (W), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W/C), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.