ind vs aus 2nd odi : 130 कोटी जनतेला हा संघ मिळवून देणार वर्ल्ड कप? आज या खेळाडूंनी भोपळाही नाही फोडला!

एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक मारणारे दोन खेळाडू, एकदिवसीय क्रिकेटमधील उत्कृष्ट फलंदाज, दोन मोठे मॅचविनर अष्टपैलू खेळाडू असतानाही संघ 120 धावांच्या आतमध्ये ऑल आऊट होतो म्हणजे मोठी शोकांतिका म्हणाली लागेल.

ind vs aus 2nd odi : 130 कोटी जनतेला हा संघ मिळवून देणार वर्ल्ड कप? आज या खेळाडूंनी भोपळाही नाही फोडला!
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 9:26 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव साधा नव्हता, कारण भारतीय संघाचा डाव अवघ्या 117 धावांवर गुंडाळला गेला होता. या 117 धावांमध्ये भारताचे असे काही प्रमुख फलंदाज आहेत ज्यांच्याकडून आगामी वर्ल्ड कपमध्ये 130 कोटी जनतेला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत तेच अपयशी ठरत आहेत. वर्ल्ड कप तयारीसाठी भारताकडे काही एकदिवसीय सामने आहेत ज्यासाठी त्यांना पूर्णपणे तयारी करावी लागणार आहे. मात्र आजचा खेळ पाहता वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ अद्याप तयार नसल्याचंच दिसत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या एकट्या मिचेल स्टार्कने भारताचा अर्धा संघ माघारी पाठवला. विकेट पडत होत्या मात्र एकही मोठी भागीदारी पाहायला मिळाली नाही. पत्त्याच्या बंगल्यासारख्या एकानंतर एक विकेट पडल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक मारणारे दोन खेळाडू, एकदिवसीय क्रिकेटमधील उत्कृष्ट फलंदाज, दोन मोठे मॅचविनर अष्टपैलू खेळाडू असतानाही संघ 120 धावांच्या आतमध्ये ऑल आऊट होतो म्हणजे मोठी शोकांतिका म्हणाली लागेल.

आज भारताच्या चार खेळाडूंना साधा भोपळाही फोडता आला नाही. यामध्ये सलामीवीर शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव हे महत्त्वाचे खेळाडू यांनाही खातं उघडता आलं नाही. त्यानंतर भारतीय संघातील बॉलिंगची धुरा सांभाळणारे गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनाही आपलं खातं उघडता आलं नाही. जर भारताला 5 किंवा धांवाची गरज असेल, 10 ते 15 ओव्हर्स शिल्लक असतील त्यावेळी गोलंदाजांना ही कामगिरी पार पाडायची असेल तर भारतीय संघाने सामना सोडूनच द्यायचा का?. कारण आमच्या गोलंदाजांना साधा बॉलही बॅटला लावता येत नाही.

कमी लक्ष्य असल्यावर बॉलर्सचा आत्मविश्वास दिसत नाही. कमी धावसंख्येचा बचाव करण्याची वृत्ती आणि धमक गोलंदाजांमध्ये दिसत नाही. अनेकवेळा पाहिलं आहे की, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड या संघांचे बॉलर जिद्दीने पेटून खेळतात आणि सामना जिंकण्यासाठी 100 टक्के प्रयत्न करतात. जास्त दूर नाही पहिलाच एकदिवसीय सामना घ्या, त्यामध्ये जडेजा आणि राहुल नसते टिकले तर तोही सामना गमावला असता.

सामना हरला याचं दु:ख नाही पण अशीच परिस्थिती जर वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेत उद्भवली तर सामना गमावण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. अजूनही भारतीय संघाचा 4 नंबरचा प्रश्न सुटलेला दिसत नाही. अजुनही वेळ गेलेली नाही संघ-व्यवस्थापनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा.

दरम्यान, तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन्ही संघांनी 1-1 ने बरोबरी केली आहे. तिसरा सामना करो वा मरो असा असणार आहे. तिसरा सामना जो संघ कोण जिंकेल तो  मालिका आपल्या खिशात घालणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.