IND vs AUS 2nd ODI | R Ashwin याचा महारेकॉर्ड, कुंबळे-कपिल देव यांना पछाडलं

Team India R Ashwin Record | आर अश्विन याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 विकेट्स घेत इतर गोलंदाजांना चांगली साथ दिली. आर अश्विनने टीम इंडियाच्या विजयात योगदान दिलं. तसेच वर्ल्ड कपसाठी त्याने दावेदारीही सिद्ध केली आहे.

IND vs AUS 2nd ODI |  R Ashwin याचा महारेकॉर्ड, कुंबळे-कपिल देव यांना पछाडलं
Follow us
| Updated on: Sep 24, 2023 | 11:44 PM

इंदूर | टीम इंडियाने रविवारी 24 सप्टेंबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 99 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला पावसामुळे 33 ओव्हरमध्ये 317 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 28.2 ओव्हरमध्ये 217 धावांवर ऑलआउट केलं. टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये शानदार कामगिरी केली. 20 महिन्यांनी वनडे कमबॅक केलेल्या आर अश्विन याने या सामन्यात निर्णायक भूमिका बजावली. आर अश्विन याने 7 ओव्हरमध्ये 41 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या.

आर अश्विन याने डेव्हिड वॉर्नर, मार्नस लाबुशेन आणि जोस इंग्लिस या तिघांची विकेट घेतली. आर अश्विन याने या 3 विकेट्सह महारेकॉर्ड केला आहे. आर अश्विन एका टीम विरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विन याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आतापर्यंत एकूण 144 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने यासह माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आणि कपिल देव यांना मागे टाकलं आहे.

अनिल कुंबळे याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध 142 विकेट्स घेतल्या. तर माजी दिग्गज ऑलराउंडर कपिल देव यांच्या नावावर 141 विकेट्सची नोंद आहे. देव यांनी पाकिस्तान विरुद्ध 141 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच कुंबळेने पाकिस्तान विरुद्ध 135 विकेट्स घेतल्या आहेत.

टीम इंडियाचे एका टीम विरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

टीम इंडियाचे बॉलर

आर अश्विन – 144 विकेट्स (ऑस्ट्रेलिया) अनिल कुंबळे – 142 विकेट्स (ऑस्ट्रेलिया) कपिल देव – 141 विकेट्स (पाकिस्तान) अनिल कुंबळे – 135 विकेट्स (पाकिस्तान) कपिल देव – 132 विकेट्स (विंडिज)

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लॅबुशेन, जोस इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड आणि स्पेन्सर जॉन्सन.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन-विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.