IND vs AUS 2nd ODI : वन क्रिकेटमध्ये भारतीय संघ बनला बादशहा, रचलाय कडक वर्ल्ड रेकॉर्ड!

भारतीय खेळाडूंनी चारशे धावांचा डोंगर उभा करताना चौकार आणि षटकारांची आतषबाजी केलेली पाहायला मिळाली. या चौकार षटकारांच्या जीवावर भारताने वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे.

IND vs AUS 2nd ODI : वन क्रिकेटमध्ये भारतीय संघ बनला बादशहा, रचलाय कडक वर्ल्ड रेकॉर्ड!
दरम्यान, भारतीय संघाची ताकद वाढलेली दिसत आहे. आताच आशिया कपं जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे.
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 12:00 AM

मुंंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने 99 धावांनी दमदार विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने  मालिकेमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यामध्ये भारताच्या खेळाडूंनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. दोन शतके आणि दोन अर्धशतकांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला तब्बल 400 धावांचं आव्हान दिलं होत. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना पावसाने हजेरी लावली आणि हे आव्हान 33 ओव्हर्समध्ये 317 धावा इतकं देण्यात आलेलं मात्र कांगारूंचा संघ अवघ्या 217 धावांवर गुंडाळला गेला.

या सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांनी शतके तर के. एल. राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके केलीत. या खेळाडूंच्या दबंग खेळीच्या जोरावर भारताने 400 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. भारतीय खेळाडूंनी चारशे धावांचा डोंगर उभा करताना चौकार आणि षटकारांची आतषबाजी केलेली पाहायला मिळाली. या चौकार षटकारांच्या जीवावर भारताने वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे.

भारताने वन डेमध्ये मारलेले सर्वाधिक षटकार

19 वि ऑस्ट्रेलिया, बेंगळुरू, 2013 19 वि न्यूझीलंड, इंदूर, 2023 18 वि बर्म्युडा, पोर्ट ऑफ स्पेन, 2007 18 वि न्यूझीलंड, क्राइस्टचर्च, 2009 18 वि ऑस्ट्रेलिया, इंदूर, 2023

भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा संघ बनला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3000 षटकारांचा आकडा गाठला. या सामन्यात भारताने एकूण 19 षटकार ठोकले, जे भारतीय संघाने एका वनडे डावात मारलेल्या दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक षटकार आहेत

दरम्यान, आजच्या सामन्यातील 19 षटकारांमध्ये सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक 6, शुबमन गिल 4 आणि  श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांनी 3 षटकार मारले होते. यामधील सूर्यकुमार यादव याने एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार मारले.

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W/C), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ (C), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (W), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन

मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.