IND vs AUS | टीम इंडियाचा इंदूरमध्ये कसा आहे रेकॉर्ड? ऑस्ट्रेलिया विरुद्ध असे आहेत आकडे

team india odi records in indore holkar stadium | टीम इंडिया वर्ल्ड कपआधी 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेत टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. जाणून घ्या टीम इंडियाचे होळकर स्टेडियममधील आकडे.

IND vs AUS | टीम इंडियाचा इंदूरमध्ये कसा आहे रेकॉर्ड? ऑस्ट्रेलिया विरुद्ध असे आहेत आकडे
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 8:13 PM

इंदूर | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरी मॅच रविवारी 24 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला दुपारी दीड वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने मोहालीमधील पहिला सामना हा 5 विकेट्सने जिंकला होता. त्यामुळे टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. यामुळे टीम इंडिया केएलच्या नेतृत्वात दुसऱ्या सामन्यात मालिका विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाचा होळकर स्टेडियममधील 2023 वर्षातला दुसरा सामना असणार आहे. टीम इंडियाने याआधी जानेवारीत न्यूझीलंड विरुद्ध 90 धावांनी विजय मिळवला होता. टीम इंडियाची इंदूरमधील आतापर्यंतची आकडेवारी आपण जाणून घेऊयात.

टीम इंडियाची इंदूरमधील आकडेवारी

टीम इंडियाने 2006 साली पहिल्यांदा इंदूरमध्ये एकदिवसीय सामना खेळला होता. टीम इंडियासमोर इंदूरमध्ये पहिल्यांदा इंग्लंडचं आव्हान होतं. टीम इंडियाने त्या सामन्यात इंग्लंडवर 7 विकेट्सने विजय मिळवला होता. टीम इंडियाने तेव्हापासून ते आतापर्यंत एकूण 6 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सहाच्या सहा सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवलाय. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाने इंदूरमध्ये खेळलेल्या एकमेव एकदिवसीय सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला होता. हा सामना 2017 साली खेळवण्यात आला होता.

त्यामुळे एकंदरीत टीम इंडियाची इंदूरमधील कामगिरी ही उल्लेखनीय आहे. त्यामुळे रविवारी टीम इंडिया इंदूरमधील विजयी घोडदौड कायम राखण्याच्या हेतूने मैदानात उतरेल. आता टीम इंडिया हा सामना जिंकून मालिका खिशात घालते, की कांगारु मालिकेत बरोबरी साधणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.

Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.