INDvsAUS | पटेल-अश्विन जोडीची शतकी भागीदारी, टीम इंडियाचा डाव आटोपला, कांगारुंकडे नाममात्र आघाडी

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव आटोपला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 262 धावा केल्या आहेत.

INDvsAUS | पटेल-अश्विन जोडीची शतकी भागीदारी, टीम इंडियाचा डाव आटोपला, कांगारुंकडे नाममात्र आघाडी
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 4:52 PM

मु्ंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया पहिल्या डावात 262 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात अवघ्या 1 धावेची नाममात्र आघाडी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 263 धावा केल्या. मात्र प्रत्युतरात टीम इंडियाचा डाव 262 धावांवर आटोपला. आर अश्विन आणि अक्षर पटेल या दोघांनी 8 व्या विकेटसाठी 113 धावांनी निर्णायक भागीदारी केली. या दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेता आली नाही.

टीम इंडिया ऑलआऊट

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाच्या फलंदाजांच्या धावा

टीम इंडियाकडून अक्षर पटेल याने सर्वाधिक 74 धावा केल्या. विराट कोहलीने 44 धावांचा योगदान दिलं. आर अश्विन याने 37 रन्स केल्या. तर कर्णधार रोहित शर्मा 32 धावा करुन माघारी परतला. चेतेश्वर पुजारा 100 व्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला. केएल राहुल याने पुन्हा निराशा केली. श्रेयस अय्यरला दमदार कमबॅक करता आलं नाही. रविंद्र जडेजा 26 धावा करुन तंबूत परतला. विकेटकीपर श्रीकर भरत 6 धावांवर बाद झाला. मोहम्मद शमी याने 2 धावा केल्या. तर मोहम्मद सिराज 1 धावा करुन नाबाद राहिला.

टीम इंडियाचा पहिला डाव

कॅप्टन रोहित आणि केएल या दोघांनी 46 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर राहुल आऊट झाला.केएल आऊट झाल्यानंतर टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती ही 7 बाद 139 अशी झाली. ऑस्ट्रेलियाला मोठ्या आघाडीचे स्वप्न दिसू लागले होते. मात्र आर अश्विन आणि अक्षर पटेल या दोघांनी कांगारुंचे मनसुबे उधळून लावले.

टीम इंडिया अडचणीत असताना या दोघांनी डाव सावरला. या जोडीने आठव्या विकेट्ससाठी 124 धावांची निर्णायक भागीदारी केली. या दरम्यान अक्षरने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र पॅट कमिन्स याने ही जोडी फोडली. अश्विन कॅच आऊट झाला. त्यानंतर अक्षर पटेलही बाद झाला. तसेच शमीच्या रुपात टीम इंडियाने 10 वी विकेट गमावली.

ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. मर्फी याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मॅथ्यू कुहनेमन याने 2 विकेट्स मिळवल्या. तर कर्णधार पॅट कमिन्स याने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजानं संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. दोघांनी सलामी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर डेविड वॉर्नर तंबूत परतला. त्याने 44 चेंडूत 15 धावांची खेळी केली. त्यानंतर ख्वाजा साथ देण्यासाठी मार्नस लाबुसेन मैदानात उतरला. दोघांनी 41 धावांची भागीदारी केली.

मार्नसला अश्विननं त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेला स्मिथ झटपट बाद झाला. ट्रेविड हेड 12 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर उस्मान ख्वाजा 81 धावांवर असताना रविंद्र जडेजाने त्याला तंबूत धाडलं. अलेक्स कॅरी मैदानात आला तसाच परत गेला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. मात्र हँडस्कॉम्ब आणि पॅट कमिन्स जोडीनं चांगली कामगिरी केली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. पण रविंद्र जडेजाने कमिन्सला पायचीत करत ही भागीदारी फोडली. टोड मर्फीही आला तसाच परत गेला. नाथन लायन (10) आणि मॅथ्यु कुहनेमन याने (6) धावा करत बाद झाले.

टीम इंडिया – रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज,

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11 – पॅट कमिन्स (कॅप्टन), डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन.

तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.