Virat Kohli | ‘रनमशीन’ विराट कोहली याचा पराक्रम, सचिन तेंडुलकर याचा मोठा रेकॉर्ड ब्रेक
टीम इंडियाने कांगारुंचा दुसऱ्या कसोटी सामन्यात 6 विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यात विराट कोहली याने सचिनचा रेकॉर्डही ब्रेक केला.
मुंबई : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा तिसऱ्यात दिवशी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने कांगारुंना 6 विकेट्सने पराभूत केलं. टीम इंडियाने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे. आर अश्विन आणि रविंद्र जडेजा ही फिरकी ऑलराउंड जोडी टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मात्र या दरम्यान ‘रनमशीन’ विराट कोहली याने मोठा कारनामा केला आहे.
विराटने आंतरराष्ट्रीय 25 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. विराट टीम इंडियाकडून 25 हजार धावा करणारा दुसरा तर एकूण 5 वा फलंदाज ठरला आहे.
विराटला सेकंड इनिंगमध्ये 25 हजार धावांसाठी अवघ्या 8 धावांची गरज होती. विराटने नाथन लायनच्या बॉलिंगवर फोर ठोकत ही भव्यदिव्य कामगिरी केली.
विक्रमवीर विराट कोहली
????????? ????????! ?
Congratulations @imVkohli on reaching 2️⃣5️⃣0️⃣0️⃣0️⃣ international runs in international cricket! ?
Simply sensational ????#TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/Ka4XklrKNA
— BCCI (@BCCI) February 19, 2023
विराटने या कामगिरीसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. विराटने वेगवान 25 हजार आंतरराष्ट्रीय धावा करण्याची किमया केली आहे. विराटने अवघ्या 549 इनिंग्समध्ये हा धमाका केलाय. तर सचिन याला आंतरराष्ट्रीय 25 हजार धावा करण्यासाठी 577 डाव खेळायला लागले होते.
दरम्यान विराट याला दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात आऊट देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याने विराट याचाही संताप पाहायला मिळाला.
टीम इंडियाच्या पहिल्या डावातील 50 व्या ओव्हरमध्ये हा सर्व प्रकार घडला. मॅथ्यू कुहनेमन ही ओव्हर टाकत होता. विराट या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर एलबीडबल्यू आऊट झाला. विराट 44 धावांवर माघारी परतला.
नक्की काय झालं?
कुहनेमन याने टाकलेल्या बॉलवर एलबीडब्ल्यूचा निर्णय फार क्लोज होता. बॉल आधी विराटच्या बॅटला लागला की पॅडला, हे स्पष्ट दिसलं नाही पण फिल्ड अंपायरने त्याला आऊट घोषित केलं.
विराटने अपांयरच्या या निर्णयाला आव्हान देत डीआरएस घेतला. आता विषय थर्ड अपांयराच्या कोर्टात गेला. थर्ड अंपायरने उपलब्ध असलेल्या सर्व सुविधांचा वापर केला. मात्र थर्ड अंपायरला स्पष्टपणे कळू शकलं नाही. विराट आऊट असल्याचा पुरावा थर्ड अंपायरकडे पण नव्हता.
थर्ड अंपायर यालाही समजू शकलं नाही की बॉल आधी पॅडला लागलाय की बॅटला. परिणामी फिल्ड अंपायर याने दिलेला सॉफ्ट निर्णय ग्राह्य धरुन विराटला आऊट जाहीर करण्यात आलं.
दरम्यान बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना हा 1 ते 5 मार्च दरम्यान इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
टीम इंडिया – रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज,
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11 – पॅट कमिन्स (कॅप्टन), डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन.