नवी दिल्ली : नागपूरनंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी राजधानी दिल्लीतही जलवा कायम ठेवला आहे. टीम इंडिया बॉलर्सने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या कसोटीतील पहिल्याच दिवशी ऑलआऊट केलं आहे. ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यासमोर शरणागती पत्कारली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 78 ओव्हरमध्ये ऑलआऊट 263 धावा केल्या.ऑस्ट्रेलियाकडून ओपनर उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक 81 धावा केल्या. तर रीटर हँड्सकॉम्ब याने अखेरपर्यंत झुंज देत नाबाद 72 रन्स केल्या. कॅप्टन पॅट कमिन्स याने 33 रन्सचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियाच्या 3 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. तर इतर फलंदाजांना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी स्वसतात आऊट केलं.
टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर फिरकी जोडी आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी पुन्हा कांगारुंना नाचवलं. या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलिया ऑलआऊट
Innings Break!
Australia are all out for 263 in the first innings.
4️⃣ wickets for @MdShami11 ??
3️⃣ wickets apiece for @ashwinravi99 & @imjadeja ??Scorecard ▶️ https://t.co/hQpFkyZGW8 #TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/RZvGJjsMvo
— BCCI (@BCCI) February 17, 2023
डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजानं संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर डेविड वॉर्नर तंबूत परतला. त्याने 44 चेंडूत 15 धावांची खेळी केली. त्यानंतर ख्वाजाला साथ देण्यासाठी मार्नस लाबुशेन मैदानात उतरला. दोघांनी 41 धावांची भागीदारी केली.मार्नसला अश्विननं त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेला स्मिथ भोपळा न फोडता आऊट झाला. ट्रेविड हेड 12 धावा करून तंबूत परतला.
त्यानंतर उस्मान ख्वाजा 81 धावांवर असताना रविंद्र जडेजाने त्याला तंबूत धाडलं. केएलने ख्वाजाचा कडक कॅच घेतला. अलेक्स कॅरी मैदानात आला तसाच परत गेला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. मात्र हँडस्कॉम्ब आणि पॅट कमिन्स जोडीनं चांगली कामगिरी केली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. पण रविंद्र जडेजाने कमिन्सला पायचीत करत ही भागीदारी फोडली. टोड मर्फीही आला तसाच परत गेला. नाथन लायन (10) आणि मॅथ्यु कुहनेमन याने (6) धावा करत बाद झाले.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11 – पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन.