IND vs AUS 2nd Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये दुसरा कसोटी सामना दिल्लीमध्ये खेळला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचा प्रयत्न 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत आघाडी 2-0 ने वाढवण्याचा आहे. पहिला सामना टीम इंडियाने एक डाव आणि 132 धावांनी जिंकला होता. शुक्रवारी दिल्लीत टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला. पॅट कमिन्सने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग 11 मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. भारताच्या टीममध्ये फक्त एक बदल झालाय.
ऑस्ट्रेलियन टीममध्ये काय बदलं?
दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने मॅट रेनशॉच्या जागी पुन्हा ट्रेविस हेडचा टीममध्ये समावेश केलाय. स्कॉट बोलँडला सुद्धा बाहेर केलय. मॅथ्यू कुहनेमन दिल्ली टेस्टमध्ये डेब्यु करेल. भारताच्या प्लेइंग 11 बद्दल बोलायच झाल्यास, सूर्यकुमार यादवला दुसऱ्या टेस्टमधून बाहेर करण्यात आलय. त्याच्याजागी श्रेयस अय्यरला संधी दिलीय.
श्रेयस अय्यरला थेट संधी
श्रेयस अय्यर नुकताच फिट झालाय. पाठदुखीमुळे तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता. श्रेयस अय्यरला फिटनेस सिद्ध करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी पाठवलं जाईल असा अंदाज बांधला जात होता. पण रोहित-द्रविड जोडीने अनुभवाला प्राधान्य दिलय. सूर्यकुमार यादव पहिल्या कसोटीत विशेष करामत दाखवू शकला नव्हता.
टॉप प्लेयर बाहेर
हेड कोच द्रविड आणि कॅप्टन रोहितने पुन्हा एकदा केएल राहुलवर विश्वास दाखवलाय. पहिल्या कसोटीत केएल राहुल फ्लॉप ठरला होता, तरी दुसऱ्या कसोटीत त्याला पुन्हा संधी दिलीय. खरंतर त्याच्यासाठी शुभमन गिलला बाहेर बसवल जातय. शुभमन गिल सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या वनड़े आणि टी 20 सीरीजमध्ये शतकी खेळी केल्या होत्या. पण तरीही त्याला राहुलसाठी बाहेर बसवण्यात येतय.
2ND TEST. India XI: KL Rahul, R Sharma (c), C Pujara, V Kohli, S Iyer, S Bharat (wk), A Patel, R Ashwin, R Jadeja, M Shami, M Siraj. https://t.co/hQpFkyZGW8 #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) February 17, 2023
टॉस हरल्यानंतर रोहित काय म्हणाला?
टॉस हरल्यानंतर रोहित शर्माने पहिली बॅटिंग करायची होती असं सांगितलं. कारण पीच ड्राय आहे. “मागच्या कसोटीत आम्ही ज्या पद्धतीचा खेळ दाखवला, त्यावरुन टॉसच महत्त्व कमी झालय. भारतात खेळताना तुम्हाला टॉसचा विचार करण्याची इतकी आवश्यकता नाही” असं रोहित शर्मा म्हणाला.
टीम इंडियाची प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज,
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11 – पॅट कमिन्स (कॅप्टन), डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन .