IND vs AUS 2nd Test : भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 113 धावात आटोपला. यात रविंद्र जाडेजाने महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्ली कसोटीच्या दुसऱ्याडावात जाडेजाची जादू चालली. त्याने आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं. ऑस्ट्रेलियाच्या एक-दोन नव्हे, तब्बल सात बॅटसमन्सना त्याने तंबूत पाठवलं. जाडेजाने दुसऱ्याडावात 12.1 ओव्हर्समध्ये 42 धावा देऊन 7 विकेट घेतल्या. टेस्ट क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये रवींद्र जाडेजाच हे करिअरमधील सर्वोत्तम प्रदर्शन आहे. याआधी रवींद्र जाडेजाने 48 धावा देऊन 7 विकेट काढल्या होत्या. 2016 साली इंग्लंड विरुद्ध चेन्नई कसोटीत जाडेजाने हे प्रदर्शन केलं होतं.
50 वर्षात दुसऱ्यांदा असं घडलं
जाडेजाने दिल्ली कसोटीच्या दुसऱ्याडावात सात विकेट काढले. त्यात पाच बॅट्समनना क्लीन बोल्ड केलं. मागच्या 50 वर्षात दुसऱ्यांदा असं झालय, जेव्हा कुठल्या स्पिनरने 5 बॅट्समनना एका इनिंगमध्ये बोल्ड केलय. याआधी अनिल कुंबळेने 1992 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गमध्ये अशी कामगिरी केली होती. वेगवान बॉलर्समध्ये पाकिस्तानचा शोएब अख्तर अशी कामगिरी करणारा शेवटचा बॉलर आहे. त्याने 2002 साली न्यूझीलंड विरुद्ध लाहोरमध्ये असं यश मिळवलं होतं.
चालू सीरीजमध्ये जाडेजाने किती विकेट काढल्यात?
दुसऱ्या कसोटीत 7 विकेट्ससह जाडेजाने बाद केलेल्या एकूण विकेटची संख्या 10 झाली आहे. त्याने 110 धावा दिल्या. जाडेजाने दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात 3 विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलिया विरुद्ध चालू बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या पहिल्या दोन कसोटीत जाडेजाने एकूण 17 विकेट काढल्यात. 2 वेळा त्याने 5 पेक्षा जास्त विकेट काढल्यात. दिल्ली कसोटीत 10 विकेट घेण्याआधी त्याने नागपूर कसोटीत 7 विकेट घेतल्या होत्या.
आता ही भिती खरी ठरलीय
फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा जाडेजाने पुरेपूर फायदा उचलला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियने टीमने थोडा सरस खेळ दाखवला होता. ती कसर टीम इंडियाने दुसऱ्याडावात भरून काढली. टेस्ट सीरीज सुरु होण्याआधी जाडेजा भारी पडेल अशी ऑस्ट्रेलियन टीममध्ये भिती होती. आता ही भिती खरी ठरलीय. जाडेजाला कसं खेळायच? या प्रश्नाच अजूनतरी ऑस्ट्रेलियन टीमला उत्तर सापडलेलं नाही. उर्वरित दोन कसोटी सामन्यांमध्येही जाडेजाच्या फिरकीच ऑस्ट्रेलियासमोर मोठं आव्हान असेल.