INDvsAUS | इंदूरमधील तिसऱ्या कसोटीत हा स्टार खेळाडू डेब्यूच्या तयारीत

टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तिसरा सामना हा 1 मार्चपासून इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

INDvsAUS | इंदूरमधील तिसऱ्या कसोटीत हा स्टार खेळाडू डेब्यूच्या तयारीत
ind vs aus 3rd test
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 11:08 PM

मुंबई | टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिले 2 कसोटी सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेतील नागपूर आणि दिल्ली कसोटीत कांगारुंवर शानदार विजय मिळवलाय. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तिसरा सामना हा 1 मार्चपासून इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आणि बॉलर पॅट कमिन्स हा कौटुंबिक कारणामुळे मायदेशी परतला आहे. त्यामुळे त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथ याच्याकडे तिसऱ्या सामन्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कमिन्सच्या जागी कुणाला संधी?

पॅटच्या जागी तिसऱ्या सामन्यात कुणाला संधी मिळणार याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र आपल्या बॉलिंगने हेल्मेट तोडणाऱ्या बॉलरला या सामन्यात डेब्यूची संधी देणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मिचेल स्टार्क दुखापतीतून सावरला आहे. स्टार्क पॅटच्या अनुपस्थितीत इंदूर टेस्टमध्ये बॉलिंग ग्रुपची जबाबदारी सांभाळेल. दुसरा पेसर म्हणून ऑस्ट्रेलियाकडे 2 पर्याय आहेत.यामध्ये स्कॉट बोलँड आणि लांस मॉरिस या दोघांचा समावेश आहे. बोलँड याला नागपूर कसोटीत संधी मिळाली होती. मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे लासं मॉरिस याला पदार्पणाची संधी मिळू शकते.

हे सुद्धा वाचा

मॉरिसची गणना ही घातक गोलंदाजांमध्ये केली जाते. मॉरिसची 150 किमी वेगाने बॉलिंग टाकण्याची क्षमता आहे. त्यामुळे जर मॉरिसला संधी मिळाली, तर टीम इंडियाच्या फलंदाजांसमोर मॉरिसच्या भेदक बॉलिंगचा सामना करणं आव्हानात्मक ठरेल.

मॉरिस देशांतर्गत क्रिकेटमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करतो. मॉरिसने या स्पर्धेत अनेक फलंदाजांचे आपल्या बॉलिंगने हेल्मेट तोडले आहेत.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेविड वॉर्नर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.