INDvsAUS | इंदूरमध्ये टीम इंडिया महारेकॉर्ड करणार, 141 वर्षांआधीचा इतिहास बदलणार!

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला इंदूर कसोटीत विजयासाठी 76 धावांचं माफक आव्हान दिलं आहे. टीम इंडियाला मोठा रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

INDvsAUS | इंदूरमध्ये टीम इंडिया महारेकॉर्ड करणार, 141 वर्षांआधीचा इतिहास बदलणार!
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 10:03 PM

इंदूर | टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियावर नागपूर आणि त्यानंतर दिल्ली कसोटी सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडिया इंदूर कसोटीतही विजयाची मालिका कायम ठेवत 3-0 अशा फरकाने मालिका जिंकेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र झालं उलटंच. ऑस्ट्रेलियाची पहिल्या 2 कसोटीत जशी अवस्था होती, तशीच काहीशी अवस्था टीम इंडियाची इंदूर कसोटीत झाली आहे. टीम इंडिया पराभवाच्या छायेत आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या 76 धावांचे आव्हान दिले आहे. मात्र त्यानंतरही टीम इंडिया इंदूरमध्ये महारेकॉर्ड करु शकते.

टीम इंडियाला हा महारेकॉर्ड करण्यासाठी आणखी काही नाही, तर 76 धावांचा बचाव करायचा आहे. थोडक्यात काय तर ऑस्ट्रेलियाला 76 धावा करण्यापासून रोखायचंय. आतापर्यंत इंदूरमध्ये 141 वर्षांपासून इतक्या धावांचा बचाव करु शकलेला नाही. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही कामगिरी केली, तर 141 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक होईल.

ऑस्ट्रेलियाने 1882 मध्ये इंग्लंड विरुद्ध 85 धावांचा यशस्वी बचाव केला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 63 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने 101 धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 122 धावा करत इंग्लंडसमोर 85 धावांचं टार्गेट ठेवलं. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी या 85 धावांचं शानदार पद्धतीने बचाव करत इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाची दुसरी इनिंग

ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया पहिल्या डावात 109 धावांवर गुंडाळून 197 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 88 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला दुसऱ्या इनिंगमध्ये 163 धावांवर रोखलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 76 धावांचं माफक आव्हान मिळालं. दरम्यान तोवर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. त्यामुळे आता तिसऱ्या दिवशी विजय मिळवून ऑस्ट्रेलिया मालिकेतील विजयाचं खातं उघडणार की टीम इंडिया 141 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक करणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवनन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुह्नमैन.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.