IND vs AUS, 3rd ODI | तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाला 440 व्हॉल्ट्सचा मजबूत झटका
टीम इंडियाने पहिल्या आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वनडेमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे तिसरा सामना हा मालिकेच्या दृष्टीने निर्णायक होता. मात्र अखेर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. यासह टीम इंडियासा मोठा झटका बसला आहे.
चेन्नई | ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात 21 धावांनी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 270 धावांचे आव्हान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 49.1 ओव्हरमध्ये 248 धावांवर ऑलआऊट केलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली आहे. टीम इंडियाला या पराभवासह मोठा झटका बसला आहे. आयसीसीने टीम इंडियाला झटका दिला आहे. टीम इंडियाने मेहनत घेऊन जी गोष्ट मिळवली होती, ती गोष्ट एका पराभवासह गमावली आहे. यामुळे टीम इंडियाचे चाहतेही नाराज झाले आहेत.
टीम इंडियाकडून विराट कोहली याने सर्वाधिक 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. हार्दिक पंड्या याने 40 धावांचं योगदान दिलं. ओपनर शुबमन गिल याने 37 रन्स दिल्या. केएल राहुल याने 32 धावा जोडल्या. कॅप्टन रोहित शर्मा याने 30 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. रविंद्र जडेजा याने 18 आणि मोहम्मद शमी याने 14 धावांचं योगदान दिलं. कुलदीप यादव याने 6 धावा केल्या. अक्षर पटेल 2 रन करुन रनआऊट झाला. मोहम्मद सिराज 3 धावांवर नाबाद राहिला. तर एकमेव सूर्यकुमार यादव याने टीम इंडियाची निराशा केली. सूर्यकुमार सलग तिसऱ्यांदा शून्यावर आऊट झाला.
ऑस्ट्रेलियाकडून एडम झॅम्पा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. एश्टन एगर याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मार्क्स स्टोयनिस आणि सिन एबोट या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाला झटका
टीम इंडियाने या मालिका पराभवासह एकदिवसीय क्रिकेट क्रमवारी अर्थात ओडीआय रँकिंगमधील अव्वल स्थान गमावलं आहे. टीम इंडियाची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तर आता ऑस्ट्रेलियाने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
A new team is at the top of the @MRFWorldwide ICC Men's ODI Team Rankings after the #INDvAUS series ?
More ?https://t.co/w8xYJLQOSR
— ICC (@ICC) March 22, 2023
या सामन्याआधी टीम इंडिया पहिल्या स्थानी होती. टीम इंडियाला मालिका विजयासाठी आणि पहिलं स्थान कायम राखण्यासाठी हा सामना करो या मरो असा होता. मात्र सामना गमावला आणि सर्व चित्र बदलंल. या विजयानंतर ऑस्ट्रेलिया 35 सामन्यात 113 रेटिंग्ससह ओडीआय रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर गेली आहे. तर टीम इंडिया 47 मॅच आणि 113 रेटिंग्स पॉइंट्सने दुसऱ्या स्थानी आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन आगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क आणि अॅडम झॅम्पा.