IND vs AUS 3rd ODI : यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहकडून ग्लेन मॅक्सवेलच्या बत्या गुल, पाहा व्हिडीओ
Jasprit Bumrah Bold Glen Maxwell : भारत आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यामध्ये बुमराहने तीन विकेट घेतल्या. यामधील मॅक्सवले याला त्याने कडक यॉर्कर टाकत आऊट केलंय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वन डे सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना कांगारूंनी 352 धावा केल्या आहेत. यामध्ये मिचेल मार्शचं शतक अवघ्या 4 धावांनी हुकलं, त्याने 96 धावा केल्या, त्यानंतर स्टीव्हन स्मिथ 74 आणि मार्नस लॅबुशेनच्या 72 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 350 धावांचा डोंगर उभारला. भारताकडून यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा मुख्य विकेट बुमराहने घेतल्या यामधील धोकादायक ग्लेन मॅक्सवेलच्या बुमराहने दांड्या गुल केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ-:
The Class of Bumrah is unmatched 🔥
– He is a genius….!!!!pic.twitter.com/fYWzwjs5dc
— Johns. (@CricCrazyJohns) September 27, 2023
जसप्रीत बुमराह गेल्या काही दिवसांपासून ग्लेन मॅक्सवेलसाठी धोकादायक ठरताना दिसत आहे. सामन्याच्या 39 व्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर बुमराहच्या खतरनाक यॉर्कर बॉलवर मॅक्सवेल चारीमुंड्या चीत झाला. मॅक्सवेल एकदा सेट झाला एकटा संपूर्ण सामना पालटवण्याची ताकद ठेवतो. आजच्याही सामन्यात कांगारूंच्या 4 विकेट गेलेल्या असताना तो मैदानात होता.
लाबुशेन आणि मॅक्सवेल मैदानात असताना दोघे डाव सावरणार असं वाटत होतं. मात्र बुमराहने मोठा गेम केला, 39 व्या ओव्हरमध्ये त्याला जगभरात यॉर्कर किंग का म्हणतात हे दाखवून दिलं आहे. आताच नाहीतर बुमरहाने याआधीसुद्धा मॅक्सवेलला यॉर्कर टाकत आऊट केलं होतं. या सामन्यात आज भारताकडून सलामीला रोहित शर्मासोबत वॉशिंग्टन सुंदर आला आहे.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (w), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (c), मिचेल स्टार्क, तनवीर संघा, जोश हेझलवूड
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्धा कृष्णा