IND vs AUS 3rd ODI Live Streaming | तिसरा आणि शेवटचा सामना कधी आणि कुठे पाहता येणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा आणि मालिकेतील शेवटचा सामना हा अतिशय प्रतिष्ठेचा आहे. टीम इंडियाचा हा सामना जिंकून मालिका विजयाचा मानस असणार आहे. तर ऑस्ट्रेलियाही विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.
चेन्नई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरी आहे. टीम इंडियाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने बरोबरी साधली. तर त्याआधी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या पहिल्या वनडे मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. त्यामुळे तिसरा सामना हा सीरिज डिसायडर आहे. म्हणजेच तिसरा सामना जिकंणारा संघ सामन्यासह सीरिजही जिंकेल. आगामी वनडे वर्ल्ड कपआधी एकदिवसीय मालिका महत्वाची आहे. त्यात टीम इंडियासाठी वनडे रँकिंगमधील अव्वल स्थान कायम राखण्यासाठी विजय महत्वाचा आहे. यामुळे हा तिसरा सामना टीम इंडियासाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. या तिसऱ्या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना हा बुधवारी 22 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.
सामन्याचं आयोजन कुठे?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियममध्ये पार पडणार आहे.
सामना किती वाजता सुरु होणार?
या तिसऱ्या वनडे सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होणार आहे.
टीव्हीवर कुठे पाहता येणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्धचा हा तिसरा सामना टीव्हीवह स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. विशेष म्हणजे इंग्रजी, हिंदी आणि इतर स्थानिक भाषेत कॉमेंट्रीसह सामना पाहता येणार आहे. तसेच लाईव्ह स्ट्रीमिंग ही डिज्नी हॉटस्टावर पाहता येईल.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.
वनडे सीरीजसाठी टीम ऑस्ट्रेलिया | स्टीवह स्मिथ (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, झाई रिचर्डसन, सेन एबॉट, कॅमरन ग्रीन, एस्टन एगर, एलेक्स कॅरी, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस आणि एडम झम्पा.