IND vs AUS 3rd ODI : तिसऱ्या वन डे सामन्यामधून ‘या’ स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता, युवा खेळाडूला संधी!
IND vs AUS 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघात मोठे बदल झाले आहेत. सीनिअर खेळाडूंनी संघात कमबॅक केलं असून दुसऱ्या वन डेमध्ये खेळाडूंना बाहेर बसवलं आहे. आजचा सामना कांगारूंसाठी महत्त्वाचा आहे.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात संघामध्ये मोठे बदल केले आहेत. या सामन्यामध्ये जवळपास अर्धा संघ बदलला आहे. आजच्या संघामध्ये एका युवा खेळाडूला संध मिळाली आहे. आर. अश्विनच्या जागेवर त्याला संघात जागा मिळाली आहे. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवावाच लागणार आहे. मागील दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवर मालिक खिशात घातली आहे. त्यामुळे आजचा सामना कांगारूंसाठी महत्त्वाचा आहे.
‘या’खेळाडूंना मिळाली एन्ट्री
रोहित शर्मा, विराट कोहली, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज या खेळाडूंना आजच्या सामन्यात कमबॅक केलं आहे. मोहम्मद शमी, इशान किशन, शुबमन गिल ऋतुराज गायकवाड आणि शार्दुल ठाकूर यांना बाहेर बसवलं आहे.
ऑस्ट्रेलिया संघातही चार बदल केले असून पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी पुनरागमन केलं आहे. तर तनवली संघा आज भारताविरूद्ध वन डे मध्ये पदार्पण करणार आहे. भारताने मागील दोन सामने जिंंकले असून आजचा सामना जिंकण्यासाठी कांगारू आपली सर्व ताकद लावतील.
दरम्या, आजच्या सामन्यानंतर वर्ल्ड कपसाठी भारतीय संघामध्ये कोणाला स्थान मिळणार समजेल. वर्ल्ड कपच्या संघांमध्ये बदल करण्यासाठी उद्याचा म्हणजेच 28 सप्टेबर शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच्या सामन्यानंतर कोणाला संघात जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (w), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (c), मिचेल स्टार्क, तनवीर संघा, जोश हेझलवूड
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा