Suryakumar Yadav | सूर्यकुमार यादव याने लाज घालवली, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तिसऱ्यांदा झिरोवर आऊट
सूर्यकुमार यादव, नावानेच फलंदाज थरथर कापतात. मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सूर्याला मॅचविनिंग खेळी सोडा साधं खातंही उघडता आलेलं नाही. सूर्याने या मालिकेत निराशा केली आहे.
चेन्नई |टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना हा चेन्नईतील एम ए चिंदबरम स्टेडयिममध्ये खेळवण्यात येत आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. तिसरा सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघात झुंज पाहायला मिळतेय. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादव याने हॅट्रिक केली आहे. सूर्याने ही नकोशी हॅट्रिक केली आहे. सूर्याने यासह लाज घालवली आहे. टीम इंडियाला सूर्याने शरमेने मान खाली करायला लावली आहे. सूर्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या तिसऱ्या सामन्यात सलग तिसऱ्या वेळा शून्यावर आऊट झाला आहे.
सूर्याला एश्टन एगर याने 36 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर क्लिन बोल्ड केलं. याआधीच्या पहिल्या 2 सामन्यात मिचेल स्टार्क याने सूर्यकुमार यादव याला झिरोवर आऊट केलं होतं. सूर्यकुमार यादव याचा टीममध्ये श्रेयस अय्यर याच्या जागी समावेश करण्यात आला आहे. श्रेयसला बॅक इंज्युरीचा त्रास झाल्याने त्याला या मालिकेला मुकावं लागलं. त्यामुळे सूर्याला संधी मिळाली. मात्र सूर्या ज्या प्रमाणे टी 20 क्रिकेटमध्ये कामगिरी करतो, तसं त्याला वनडेमध्ये करण्यात अपयश आलं.
सूर्याची गेल्या 11 डावातील कामगिरी
सूर्या गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अपयशी ठरतोय, असं आम्ही नाही तर आकडेवारी सांगतेय. सूर्याला गेल्या 11 डावात अर्धशतकही करता आलेलं नाही. सूर्याची 11 डावातील 34 नाबाद ही सर्वोच्च धावसंख्या आहे. सूर्याने गेल्या 11 डावांमध्ये 9,8,4,34*,6,4,31,14, 0, 0 आणि 0 अशा धावा केल्या आहेत.
सूर्या सोशल मीडियावर ट्रोल
दरम्यान सूर्यकुमार यादव याला निराशाजनक कामगिरीमुळे ट्रोल झाला आहे. सूर्यावर मिम्सद्वारे टीका केली जात आहे.तसेच याला टीममधून काढून संजू सॅमसन याला खेळवा, अशी मागणी होतेय. तसेच ज्याला 3 मॅचमध्ये एक धाव काढता येत नाही, तो कसला मिस्टर 360 असंही म्हटलं जात आहे. तर काही चाहते मात्र सूर्याच्या पाठीशी आहे. सूर्या पुन्हा जोरदार कमबॅक करेल आणि टीम इंडियाला विजय नक्की मिळवून देईल, असा विश्वास या चाहत्यांनी व्यक्त केला आहे.
सूर्या सलग तिसऱ्यांदा झिरोवर आऊट
Suryakumar Yadav will comeback stronger ? pic.twitter.com/IHyRAXpzTL
— CricTracker (@Cricketracker) March 22, 2023
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (क), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन आगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क आणि अॅडम झॅम्पा.