IND vs AUS 3rd ODI : रोहित आणि राहुलकडे संघामध्ये प्रयोगाची शेवटची संधी, दोन खेळाडू आऊट?
IND vs AUS 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना उद्या 27 ऑक्टोबरला पार पडणार आहे. या सामन्यात टीममध्ये बदल झालेले पाहायला मिळू शकतात. दोन ते तीन खेळाडू बाहेर बसेल जावू शकतात.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा आणि मालिकेतील अखेरचा सामना 27 ऑक्टोबरला होणार आहे. या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया संघाच्या हातून मालिका गेली असून व्हाईटवॉश टाळण्याच कांगारूंचा प्रयत्न असणार आहे. आगामी वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा झाली आहे मात्र 28 ऑक्टोबरला फायनल संघ जाहीर करायचा आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यामध्ये संघ व्यवस्थापनाला रोहित अँड कंपनीमध्ये काही प्रयोग करायचे असतील तर हा शेवटचा सामना असणार आहे. बदल केले नाहीतर तर वर्ल्ड कप साठी जो फायनल संघ असेल तोच संघ उद्याच्या (27 ऑक्टोबर) सामन्यामध्ये मैदानात उतरू शकतो.
संघामध्ये बदल करण्याची शेवटची संधी
तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यामध्ये भारतीय संघाचे मुख्य खेळाडू कमबॅक करणार असल्याचं बोललं जात आहे. कारण पहिल्या दोन सामन्यांसाठी त्यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे शेवटच्या सामन्यात हे खेळाडू संघात परतू शकतात. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू संघात येतील त्यामुळे राहिलेल्या खेळाडूंमध्ये संघ व्यवस्थापनाला जे काही बदल करायचे आहेत ते करतील.
राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या सामन्यामध्ये ओपनर शुभमन गिल आणि शार्दुल ठाकूर यांना विश्रांती दिली जावू शकते. मात्र जे काही बदल करायचे असतील ते करण्याची शेवटची संधी असून आहे. भारताने जे काही प्रयोग केले ते काहीसे यशस्वी ठरले नाहीत. बांगलादेशकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. मात्र ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या प्रत्येक खेळाडूने आपली छाप पाडलेली दिसली. जखमी श्रेयस अय्यरनेही कमबॅक करत शतक ठोकत टीकाकारांना उत्तर दिलं.
दरम्यान, आर. अश्विनला दोन सामन्यांमध्ये संधी मिळाली त्यामध्ये त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे. त्यामुळे अश्विनला वर्ल्ड कप संघामध्ये जागा मिळण्याची शक्यता आहे. कारण भारताच्या ताफ्यात एक अनुभवी ऑफ स्पिनरची गरज आहे. त्यामुळे अश्विनच्या जागेवर कोणाला बाहेर बसावू लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वन डे वर्ल्डकपसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मो. शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर.