IND vs AUS : तिसऱ्या वनडे सामन्यात हे खेळाडू ठरतील वरचढ, जाणून प्लेइंग इलेव्हन आणि पिच रिपोर्ट
IND vs AUS, 3rd ODI : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा वनडे सामना राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल असणार आहे. त्यामुळे खेळाडूंची निवड करताना अंदाज घ्या. त्यामुळे बेस्ट खेळाडू निवडणं सोपं होईल.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना राजकोट येथे खेळला जाणार आहे. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची ही मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना औपचारिक सामना असेल यात दुमत नाही. पण वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे संघात काही बदल अपेक्षित आहेत. अपेक्षेप्रमाणे पहिल्या दोन वनडे सामन्यात रोहित शर्मा आणि इतर खेळाडू खेळले नव्हते. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात हे खेळाडू खेळताना दिसतील. दुसरीकडे, शुबमन गिल आणि शार्दुल ठाकुर यांना आराम देण्यात आला आहे. म्हणजेच तिसरा वनडे सामना रोहित शर्मा याच्या नेतृत्वात खेळला जाईल. तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना संधी मिळेल.
कुठे आहे सामना आणि पिच रिपोर्ट
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानात आहे. दुपारी 1.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. नाणेफेकीचा कौल 1 वाजता होईल. सौराष्ट्र मैदानातील खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली आहे. वेगवान गोलंदाजांना सीम आणि स्विंग मिळेल. त्यामुळे फलंदाजीसाठी थोडी अडचण येऊ शकते. बॉन्ड्री छोटी असल्याने धावांचा वर्षाव होईल. या मैदानावर 267 पेक्षा जास्त धावा होऊ शकतात. नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर फलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल.
कशी असेल लकी इलेव्हन
विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल, डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, कॅमरोन ग्रीन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मिचेल स्टार्क
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलिया : डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरोन ग्रीन, जोश इंग्लिस, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स, सीन अबोट, एडम झम्पा.