IND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवाला सूर्याने पाहा कोणाला ठरवलं व्हिलन, म्हणाला…
IND vs AUS 3rd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या सामन्यात 5 विकेटने भारतीय संघाचा पराभव झाला होता. ग्लेन मॅक्सवेलच्या शतकी खेळीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. सूर्याने या सामन्यात पाहा कोणाला दोषी मानलं आहे.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये 5 धावांनी भारताचा पराभव झाला. ग्लेन मॅक्सवेल याच्या शतकी खेळीसमोर भाारताच्या गोलंदाजांनी गुडघे टेकल्याचं पाहायला मिळालं. मॅक्सवेलने भारताच्या एकाही गोलंदाजाला सोडलं नाही. भारताने शेवटच्या दोन ओव्हरमध्ये सामना गमावला. मात्र कर्णधार सूर्यकुमार यादव याने या पराभवासाठी पाहा कोणाला व्हिलन मानलं आहे.
पाहा सूर्यकुमार काय म्हणाला?
मॅक्सवेलला लवकरात लवकर आऊट करण्याचा प्लॅन होता. दव पडलेलं असताना 220 धावा डिफेंड करणं कठीण होतं. गोलंदाजांना फारशी काही मदत मिळाली नाही. सर्व खेळाडूंना साांगितलं होतं की मॅक्सीला लवकर आऊट करू पण तसं काही झालं नाही. त्यानेही धोकादायक खेळी केली, अक्षर पटेल अनुभवी स्पिनर असून दव पडलेलं असताना त्याला थोडीफार मदत मिळेल असं वाटलं होतं. मात्र तसं काही झालं नाह. मला माझ्या खेळाडूंचा अभिमान असल्याचं सूर्यकुमार यादव याने म्हटलं आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 222-3 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताकडून ऋतुराज गायकवाड याने शतकी खेळी केली होती. अवघ्या 57 बॉलमध्ये 13 चौकार आणि 7 षटकार मारत त्याने 123 धावा केल्या होत्या. तिलक वर्मा याने नाबाद 31 तर सूर्यकुमार यादवने 39 धावा केल्या होत्या. यशस्वी जयस्वाल अपयशी ठरलेला दिसला. अवघ्या 6 धावा करून तो माघारी परतला.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने दमदार सुरूवात केली होती. 47 धावांवर असताना अॅरॉन हार्डी आऊट झाला. जोश इंग्लिस 10 धावा आणि मार्कस स्टॉइनिस 17 धावांवर आऊट झाले. मात्र ग्लेन मॅक्सवेलने एकट्याने सामना ओढला. 48 बॉलमध्ये 108 धावा करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अॅरॉन हार्डी, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (w/c), नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा, केन रिचर्डसन
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, टिळक वर्मा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, प्रसिद्धा कृष्णा