INDvsAUS, 3rd Test | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने, Indore मध्ये कोण ‘आऊट’ होणार?

इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 1 मार्चपासून बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.

INDvsAUS, 3rd Test | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने, Indore मध्ये कोण 'आऊट' होणार?
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 11:33 PM

इंदूर | बातमी आहे क्रिकेट विश्वातून. बुधवारी 1 मार्चपासून बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर टॉस 9 वाजता होणार आहे. टीम इंडिया या 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. टीम इंडियासाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. जाणून घेऊया सविस्तर.

मालिका विजय

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर नागपूर आणि त्यानंतर दिल्ली कसोटीत एकतर्फी फरकाने विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडियाला तिसरी कसोटी जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. तसेच हा सामना जिंकल्यास टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचेल.

यासह टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात दुसऱ्यांदा पोहचणारी पहिलीच टीम ठरेल. टीम इंडिया याआधी 2021 मध्ये फायनलमध्ये पोहचली होती. तेव्हा न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला होता. त्यामुळे टीम इंडियासाठी हा तिसरा सामना मालिका आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या हिशोबाने फार महत्वाचा आहे.

हे सुद्धा वाचा

कॅप्टन रोहितला धोनीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने या मालिकेतील 2 तर त्याआधी 2 अशा 4 सामन्यात सलग विजय मिळवला आहे. त्यानुसार रोहितने कर्णधार म्हणून पहिल्या 4 सामन्यात सलग विजय मिळवलाय. इंदूरमध्ये टीम इंडियाचा विजय झाल्यास रोहितचा कॅप्टन म्हणून सलग 5 वा विजय ठरेल. यासह रोहित कॅप्टन म्हणून सलग कसोटी सामने जिंकण्याचा टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करेल.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव स्मिथ (कॅप्टन), एश्टन एगर, स्कॉट बोलैंड, एलेक्स कॅरी, कैमरून ग्रीन, पीटर हैंड्सकॉम्ब, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मॅथ्यू कुह्नमॅन, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, लांस मॉरिस, टॉड मर्फी, मैथ्यू रेनशॉ ,मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.