IND vs AUS : वडिलांच्या निधनानंतर परतलेल्या उमेश यादव याने 2 सिक्स मारत मोडला सिक्सर किंगचा ‘तो’ रेकॉर्ड

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने छोटेखानी देखणी खेळी केली. उमेशने 17 धावा केल्या. या आक्रमक खेळीने उमेश यादवने डायरेक्ट सिक्सर किंगचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

IND vs AUS : वडिलांच्या निधनानंतर परतलेल्या उमेश यादव याने 2 सिक्स मारत मोडला सिक्सर किंगचा 'तो' रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 9:26 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारत काहीसा बॅकफूटवर ढकलला गेला आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 109 धावांवर गुंडाळला. यामध्ये विराट कोहली याने सर्वाधिक 22 धावा केल्या. तळाला फलंदाजीला आलेल्या भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने छोटेखानी देखणी खेळी केली. उमेशने 17 धावा केल्या यामध्ये त्याने दोन सिक्स आणि एक चौकार मारला. या आक्रमक खेळीने उमेश यादवने डायरेक्ट ‘सिक्सर किंग’चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

भारतीय संघाच्या 88 धावांवर असताना 8 विकेट्स गेल्या होत्या. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उमेश यादव आला होता. उमेशने नेहमीप्रमाणे आपला दांडपट्टा चालवला आणि 13 चेंडूत 17 धावा करत संघाला शंभरी पार करून दिली. यात त्याने दोन गगनचुंबी सिक्स आणि 1 चौकार मारला. उमेशच्या दोन सिक्सने सिक्सर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराज सिंहचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. युवराजने कसोटीमध्ये 40 सामन्यांमध्ये 22 षटकार मारले आहेत. आजच्या सामन्यातील सिक्ससह उमेशने कसोटीमध्ये आतापर्यंत 24 षटकार लगावले आहेत.

उमेश यादवेन युवराजच नाहीतर भारताचे माजी कोच आणि खेळाडू रवी शास्त्री यांचाही रेकॉर्ड मोडला आहे. 80 कसोटी सामन्यांमध्ये रवी शास्त्री यांनीही 22 षटकार मारले होते. उमेशने दोन सिक्स मारत दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं आहे. इतकंच नाहीतर उमेश यादवने 24 सिक्स मारत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. उमेश यादव याच्या वडिलांचं निधन झालं होतं, त्यानंतर विधी करून तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध राहिला.

दरम्यान, भारतीय संघाचा डाव 109 धावांवर आटोपल्यानंतर फलंदाजीला आलेल्या कांगारूंनी 156 धावा करत 47 रन्सची आघाडी घेतली आहे. कांगारूंनी आपल्या चार विकेटेस गमावल्या असून या सर्व विकेट्स जडेजाने घेतल्या आहेत. उमेश यादवने 2 षटके टाकलीत यामध्ये त्याने 2 धावा दिल्या. भारतीय संघ उद्या म्हणजेच गुरूवारी लवकर गुंडाळण्याच्या प्रयत्नात असेल.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवनन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुह्नमैन.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.