INDvsAUS | चौथ्या कसोटीतून हा खेळाडू ‘आऊट’, स्टार गोलंदाजाला संधी!
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथा आणि शेवटचा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
अहमदाबाद | बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 9 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह 4 सामन्यांच्या मालेकत 2-1 अशी स्थिती झाली आहे. टीम इंडियाच्या या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची प्रतिक्षा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला जर wtc फायनलमध्ये पोहचायचं असेल, तर कोणत्याही परिस्थितीत टीम इंडियाला मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा या चौथ्या कसोटीतून एका बॉलरला बाहेरचा रस्ता दाखवत त्याजागी घातक खेळाडूला संधी देऊ शकतो.
उभयसंघातील हा चौथा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना 9 मार्चपासून सुरु होणार आहे. टीम इंडियाला स्वत:च्या जोरावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचायचं असेल, तर हा सामना जिंकावा लागेल. अन्यथा टीम इंडियासाठी जर तरचं समीकरण लागू होईल.
रोहित शर्मा चौथ्या कसोटीत उमेश यादव याच्या जागी मोहम्मद शमी याला संधी देऊ शकतो. शमीला तिसऱ्या कसोटीत वर्कलोडमुळे विश्रांती देण्यात आली होती.
शमी आतापर्यंत सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज राहिलाय. शमीने एकूण 2 साम्यांमध्ये 30 ओव्हर बॉलिंग करत 7 विकेट्स घेतल्या. अहमदाबादमधील कोरड्या खेळपट्टीवर टीम इंडियाला शमीची गरज लागेल. अशी खेळपट्टी रिव्हर्स स्विंग टाकणाऱ्या गोलंदाजांसाठी मदतशीर ठरू शकते.
चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, एश्टन एगर, स्टीव्ह स्मिथ, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क आणि मिचेल स्वीपसन.