IND vs AUS : पॉवरप्लेमध्ये यशस्वी जयस्वाल याचं चुकलं का? असं केल्याने बसला मोठा फटका
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. संध्याकाळच्या सामन्यात दव मोठी भूमिका बजावत असल्याने हा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियासमोर मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान आहे. पण पॉवरप्लेमध्ये यशस्वीकडून मोठी चूक झाली.
मुंबई : भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा टी20 सामना सुरु आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. सामना जिंकायचा तर मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान होतं. पण पहिली तीन षटक भारताला हवी तशी कामगिरी करण्यात अपयश आलं. 20 षटकांच्या सामन्यात पॉवरप्लेची सहा षटकं महत्त्वाची ठरतात. पण झालं असं यशस्वी जयस्वाल याला या षटकांमध्ये मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 6 षटकात फक्त 50 धावा करता आल्या. 36 चेंडूपैकी 28 चेंडू एकटा यशस्वी जयस्वाल खेळला. तर ऋतुराज गायकवाडला फक्त 8 धावांचा सामना करता आला. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान असताना पॉवरप्लेची सहा षटकं खऱ्या अर्थाने वाया गेली असंच म्हणावं लागेल. यशस्वी जयस्वाल मैदानात उतरल्यानंतर स्ट्राईकला आला आणि पहिलं तीन त्याने खेळली.
यशस्वी जयस्वालने पहिल्या षटकातील पाच चेंडू निर्धाव गेली. सहाव्या चेंडूवर लेग बाय धाव घेतली. दुसऱ्या षटकात पुन्हा स्ट्राईक मिळाला. या षटकात 11 धावा घेण्यात यश आलं. पण स्ट्राईक स्वत:कडेच ठेवली. तिसऱ्या षटकात 12 धावा आल्या पण यात एक लेग बाईज चौकार मिळाला. चौथ्या षटकात ऋतुराजला स्ट्राईक मिळाली. पण फक्त पाच धावा आल्या. पाचव्या षटकात 14 धावा आल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात फक्त 7 धावा आल्या आणि शेवटच्या चेंडूवर यशस्वी जयस्वालने विकेट टाकली. यशस्वी जयस्वालने 28 चेंडूत 37 धावा केल्या.
चौथा टी20 सामना ऑस्ट्रेलियासाठी खूपच महत्त्वाचा आहे. मालिका बरोबरीसाठी हा सामना जिंकावाच लागणार आहे. तर भारताचा मालिका विजयासाठी प्रयत्न असेल. पण तीन गडी झटपट बाद झाल्याने टीम इंडिया बॅकफूटवर आली आहे. यशस्वी जयस्वालनंतर श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाले.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, अॅरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (कर्णधार/विकेटकीपर), बेन ड्वार्शुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर संघा.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, दीपक चहर, आवेश खान, मुकेश कुमार.