IND vs AUS : चौथ्या टी20 सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल! श्रेयस अय्यरच्या एन्ट्रीने हा खेळाडू होणार बाहेर
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील तीन सामने झाले असून 2-1 अशी स्थिती आहे. तिसरा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिकेत कमबॅक केलं आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी चौथा सामना निर्णायक ठरणार आहे. अन्यथा ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर भारी पडू शकते.
मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-1 अशी स्थिती आहे. भारताने दोन, तर ऑस्ट्रेलियाने 1 सामना जिंकला आहे. तिसरा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिकेतील आपलं अस्तित्त्व कायम ठेवलं आहे. त्यामुळे भारताचा मालिका विजयाचं स्वप्न अजून एक सामना दूर गेलं आहे. चौथा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघ श्रेयस अय्यरची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळणार आहे. श्रेयस अय्यर आणि दीपक चाहर यांना संघात स्थान मिळेल, हे जवळपास निश्चित आहे. श्रेयस अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं तर कोणाला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असा प्रश्न समोर येत आहे.
उपकर्णधार श्रेयस अय्यरला तिलक वर्माच्या जागी संघात स्थान मिळू शकते. तर दीपक चाहरला प्रसिद्ध कृष्णाऐवजी संघात घेतलं जाईल. तिसऱ्या टी20 सामन्यात प्रसिद्ध कृष्णा खूपच महागडा ठरला होता. तर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांच्यापैकी संघात कोणाला स्थान मिळतं? हे नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर स्पष्ट होईल. तर अंतिम दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही बदल होऊ शकतो.
स्टीव्ह स्मिथ, एडम झाम्पा, ग्लेन मॅक्सवेल, सीन एबॉट, जोश इंग्लिस आणि मार्कस स्टोइनिस यांना आराम दिला जाऊ शकतो. तर विकेटकीपर बॅटर जोश फिलिप्स आणि बेन मॅकडेरमॉट, बेन द्वारशुईस आणि फिरकीपटू ख्रिस ग्रीन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी20 सामना रायपूरमध्ये होणार आहे. 1 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यातही दव मुख्य फॅक्टर ठरणार आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर धावांचा पाठलाग करणं पसंत केलं जाईल.
चौथ्या टी20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रवि बिष्णोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, दीपक चाहर