IND vs AUS 4th Test : तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला, नितीश कुमार रेड्डीच्या शतकामुळे भारताचं कमबॅक
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंंतिम फेरीच्या दृष्टीने चौथा कसोटी सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. हा सामना सुरुवातील ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात झुकला होता. पण नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर जोडीने अडचणीतून हा सामना बाहेर काढला.
मेलबर्न कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने कमबॅक केलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 474 धावांचं सडेतोड उत्तर दिलं आहे. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा विजयाचा हुरूप वाढला होता. तर प्रत्येक चेंडू टाकताना अहंकार दिसत होता. असं असताना आठव्या स्थानावर आलेल्या नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं. 191 धावांवर सात विकेट गेल्यानंतर सहज सामना खेचून आणू असा ऑस्ट्रेलियाला विश्वास होता. कारण त्यांच्याकडे 283 धावांची मोठी आघाडी होती. तळाच्या फलंदाजी फार फार किती धावा करू शकतात याचा अंदाज होता. रविंद्र जडेजाची विकेट पडल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीला आला आणि सामना हातून गेल्यातच जमा आहे असं वाटत होतं. पण नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने कमाल केली. दोघांनी सर्वात आधीच टीम इंडियावरील फॉलोऑनचं संकट टाळलं. त्यानंतर एक एक धाव घेत ऑस्ट्रेलियाची आघाडी कमी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 9 गडी गमवून 358 धावा केल्या आहेत. नितीश कुमार रेड्डी नाबाद 105, तर मोहम्मद सिराज नाबाद 2 धावांवर खेळत आहे. खराब प्रकाशमानामुळे पंचांना सामना लवकर थांबवण्याचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियाकडे अजूनही 116 धावांची आघाडी आहे. ही आघाडी चौथ्या दिवशी काही धावांनी कमी होऊ शकते. जर या जोडीने आणखी 50 धावांची भागीदारी केली तर ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा मनसुबा उधळून निघेल. आता चौथ्या दिवशी हे दोघं फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे. पहिल्या डावात भारातकडून यशस्वी जयस्वाल, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. यशस्वी जयस्वालने 118 चेंडूत 82 धावा करून धावचीत झाला. वॉशिंग्टन सुंदरने 162 चेंडूत 50 धावा केल्या. तर नितीश कुमार रेड्डी 176 चेंडूचा सामना करत नाबाद 105 धावांवर खेळत आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप