9, 0, 5…! भारताच्या दिग्गज खेळाडूंची महत्वाच्या सामन्यात खेळी, रोहित-विराटच्या खेळीमुळे क्रीडाप्रेमींचा संताप

मेलबर्न कसोटी सामना ऑस्ट्रेलिया जिंकणार की ड्रॉ होणार अशी स्थिती आहे. ऑस्ट्रेलियाची शेवटची विकेट पाचव्या दिवशी 7 धावा होताच पडली.भारतासमोर 340 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं. हे आव्हान भारतीय संघ गाठेल की नाही यावर शंका होती. त्यात दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहून क्रीडाप्रेमींचा संताप झाला आहे.

9, 0, 5...! भारताच्या दिग्गज खेळाडूंची महत्वाच्या सामन्यात खेळी, रोहित-विराटच्या खेळीमुळे क्रीडाप्रेमींचा संताप
Follow us
| Updated on: Dec 30, 2024 | 9:16 AM

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 340 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हे आव्हान गाठताना भारताच्या दिग्गज खेळाडूंनी नांगी टाकली आहे. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा ही जोडी मैदानात आली होती. रोहित शर्मा या सामन्यात काहीतरी करेल अशी अपेक्षा होती. पण पुन्हा एकदा क्रीडाप्रेमींचा भ्रमनिरास झाला. रोहित शर्माला काही खास करता आलं नाही. 40 चेंडूत 9 धावा केल्या आणि पॅट कमिन्सचा शिकार झाला. त्यामुळे क्रीडाप्रेमींना डोक्यावर हात मारण्याशिवाय पर्याय नव्हता. केएल राहुलला खातंही खोलता आलं नाही. चार चेंडूचा सामना केला आणि पाचव्या चेंडूवर पॅट कमिन्सला विकेट देऊन आला. त्यामुळे भारतावर दबाव वाढला. विराट कोहली यशस्वी जयस्वालला साथ देईल असं वाटत होतं. त्याचा अनुभव पाहता त्याची टीम इंडियाला मदत होईल असं वाटत होतं. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर पुन्हा एकदा फेल गेला. 29 चेंडूत 5 धावा करून स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतला.

तीन दिग्गज खेळाडू झटपट बाद झाल्याने टीम इंडियावरील टेन्शन वाढलं आहे. हा सामना महत्त्वाचा असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने निदान ड्रॉ करणं महत्त्वाचं आहे. असं असताना अशा सामन्यातील खेळी पाहून क्रीडाप्रेमींचा संताप झाला आहे. दुसरीकडे, यशस्वी जयस्वालने चांगला तग धरला आहे. अर्धशतकी खेळी करत पाचव्या दिवसाचा वेळ काढण्याचा केविळवाणा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर आडमतेडम खेळणारा ऋषभ पंत सुनील गावस्कर यांनी फटकारल्यानंतर काही अंशी सरळ खेळताना दिसत आहे. आता भारतीय क्रीडाप्रेमी देव पाण्यात बुडवून बसले आहे. निदान सामना ड्रॉ व्हावा अशी प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेने आपलं स्थान पक्कं केलं आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यापैकी एका संघाची अंतिम फेरीत वर्णी लागणार आहे. पण भारताचं गणित खूपच कठीण दिसत आहे. त्या तुलनेत ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध शेवटच्या सामन्यात होम ग्राउंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या पुढच्या मालिकेचा आधार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात अंतिम फेरीचा सामना होण्याची शक्यता आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.