IND vs AUS 4th Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु आहे. या टेस्टमध्ये टीमला गरज असताना विराट कोहलीने झुंजार शतक झळकवल. जवळपास तीन वर्षानंतर विराटने शतकी कामगिरी केलीय. कसोटी क्रिकेटमधील त्याच हे 29 व तर क्रिकेट करिअरमधील 75 व शतक आहे. आज रविवारी चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली. टीम इंडियाने आज सकाळच्या सत्रात रवींद्र जाडेजाच्या रुपाने विकेट गमावली.
309 रन्सवर टीम इंडियाची चौथी विकेट गेली. केएस भरत आज चांगली फलंदाजी करतोय. 131 ओव्हर्समध्ये टीम इंडियाच्या 4 बाद 362 धावा झाल्या होत्या.
टीम इंडियाला ते महाग पडलं असतं
श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे केएस भरतला वरती फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. विराट कोहलीने आज एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी नॉन स्ट्राइकला उभ्या असलेल्या केएस भरतने त्याला नकार दिला. भरतने माघार घेणं कोहलीला आवडलं नाही. ही चोरटी धाव घेण्याच्या नादात विकेट गेली असती, तर टीम इंडियाला ते महाग पडलं असतं. विराट कोहली भरतवर किंचाळला.
what shashtri said pic.twitter.com/seyp1JbNY7
— check pinned (@viratxakshay) March 12, 2023
बॉलर्स चांगलेच हैराण
विराट कोहलीच्या संयमी खेळीने ऑस्ट्रेलियन बॉलर्स चांगलेच हैराण झाले. लंचला खेळ थांबला, तेव्हा विराट कोहली 88 धावांवर होता. पहिल्या सेशनमध्ये टीम इंडियाच्या 4 बाद 362 धावा झाल्या होत्या. विराटने लंचनंतर सेंच्युरी झळकवली. विराटने त्याच्या शतकी खेळीत फक्त पाच चौकार मारले.
श्रीकर भरत 44 रन्सवर आऊट झाला. त्याने 88 चेंडूत 44 धावा केल्या. यात 2 चौकार आणि 3 सिक्स मारले. रवींद्र जाडेजा 84 चेंडूत 28 रन्सवर बाद झाला. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला.