IND vs AUS : चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ फॉलोऑनच्या गर्तेत, हातात 5 गडी आणि 111 धावांची गरज

चौथ्या कसोटी सामन्यावरील भारताची पकड हळूहळू सैल होत चालली आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 474 धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना भारताचा निम्मा संघ दुसऱ्या दिवशीच तंबूत परतला आहे. इतर खेळाडूंकडून क्रीडाप्रेमींना फार काही अपेक्षा नाहीत.

IND vs AUS : चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ फॉलोऑनच्या गर्तेत, हातात 5 गडी आणि 111 धावांची गरज
Follow us
| Updated on: Dec 27, 2024 | 12:53 PM

भारताने पहिल्या डावाची सुरुवात एकदम निराशाजनक केली. त्यामुळे तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगणार आहे. गेल्या काही सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाची खराब कामगिरी अनुभवायला मिळाली आहे. टी20 वर्ल्डकप विजयानंतर रोहित शर्माने लय गमवल्याचं स्पष्ट दिसत आहे. दुसरीकडे विराट कोहलीही फॉर्मसाठी चाचपडताना दिसत आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्व गडी बाद 474 धावा केल्या. यात मोहम्मद सिराजने सर्वात महागडा स्पेल टाकला. एकही गडी न बाद करता 100 हून अधिक धावा दिल्या. त्यात भारताची सुरुवातच निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मा सलामीला उतरला आणि अवघ्या तीन धावा करून तंबूत परतला. त्यानंतर केएल राहुलही काही खास करू शकला नाही. यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीने चांगली भागीदारी केली. या दोघांमध्ये 102 धावांची भागीदारी. यशस्वी जयस्वाल 82 धावांवर असताना धावचीत झाला आणि सामन्याचं चित्रच पालटलं. त्यानंतर आकाश दीपला नाईट वॉचमन म्हणून पाठवलं. पण त्याच्याही फार काही उपयोग झाला नाही.

विराट कोहली 86 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 36 धावा करून बाद झाला. तर आकाश दीपला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे भारताचा पराभव होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यातल्या त्यात सन्मानजनक पद्धतीने पराभव व्हावा ही क्रीडाप्रेमींची इच्छा आहे. भारताला फॉलोऑन टाळण्यासाठी 275 धावा करायच्या आहेत. आता भारताच्या 164 धावा झाल्या असून अजून 111 धावांची आवश्यकता आहे. पाच गडी हातात शिल्लक असताना या धावा गाठणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. ऋषभ पंत नाबाद 6 आणि रवींद्र जडेजा नाबाद 4 धावांवर खेळत आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.