IND vs AUS | अक्षर पटेल याचं शतक हुकलं, सुनील गावसकर यांनी तोंडावरच सुनावलं

अक्षर पटेल याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात 113 बॉलमध्ये 5 चौकार आणि 4 खणखणीत षटकारांसह 79 धावा केल्या.

IND vs AUS | अक्षर पटेल याचं शतक हुकलं, सुनील गावसकर यांनी तोंडावरच सुनावलं
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 10:12 PM

अहमदाबाद | बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथा कसोटी सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडिया सामन्यात 88 धावांनी आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या. या प्रत्युतरात टीम इंडियाने ऑलआऊट 571 धावा केल्या. यासह टीम इंडियाने 91 धावांची आघाडी घेतली.

टीम इंडियाकडून विराट कोहली याने शानदार 186 धावांची खेळी केली. अवघ्या काही धावांसाठी त्याचं द्विशतक हुकलं. विराट याने 364 बॉलमध्ये 15 चौकार ठोकले. त्याखालोखाल शुबमन गिल याने 128 रन्सची शतकी खेळी साकारली. तर लोकल बॉय अक्षर पटेल याने 113 बॉलमध्ये 5 चौकार आणि 4 खणखणीत षटकारांसह 79 धावा केल्या. अक्षरने विराटला चांगली साथ देत फटकेबाजी केली. मात्र दुर्देवाने त्याच्या बॅटला कट लागला आणि तो बोल्ड झाला. यामुळे त्याची शतकाची संधी हुकली.

अक्षर या मालिकेत सुरुवातीपासून ते आतापर्यंत बॅटिंगने जबरदस्त कामगिरी करत आलाय. इंदूर कसोटीतील दोन्ही डावात तो नाबाद राहिला. अक्षरने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात 70, दिल्लीतील दुसऱ्या सामन्यात 74, इंदूरमधील तिसऱ्या सामन्यात 12* आणि 15*, तर आता 79 धावा केल्या. अक्षरने आतापर्यंत एकूण 250 धावा केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

या मालिकेत अक्षरला एक नाही दोन नाही तर 3 वेळा शतक ठोकण्याची सुवर्णसंधी होती. मात्र त्याआधीच तो 70 ते 80 धावांदरम्यान आऊट झाला. अहमदाबादमध्ये 79 धावांवर आऊट झाला. टीम इंडियाचे माजी कर्णधार लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी हाच धागा धरत अक्षरवर संतापले. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मैदानात जतिन सप्रू, सुनील गावसकर आणि संजय बांगर उपस्थित होते. यावेळेस अक्षरने आपल्या खेळीबाबत प्रतिक्रिया दिली. या दरम्यान गावसकर यांनी अक्षरला शतकावरुन सुनावलं.

सुनील गावसकर काय म्हणाले?

“शतक करण्याची संधी वारंवार मिळत नाही. आता चुकलास, मात्र पुन्हा चुकूस नकोस. पुढच्या वेळेस शतक ठोकून ये”, असं गावसकर अक्षरला म्हणाले. दरम्यान आता 88 धावांनी पिछाडीवर असलेली ऑस्ट्रेलिया पाचव्या दिवशी काय करते, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.