IND vs AUS : पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने रचला 474 धावांचा डोंगर, टीम इंडियासमोर मोठं आव्हान

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा दुसऱ्या दिवस सुरु आहे. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने सर्वबाद धावा केल्या. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर रचल्याने टीम इंडिया अडचणीत आली आहे. भारतीय फलंदाज आता कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून आहे.

IND vs AUS : पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने रचला 474 धावांचा डोंगर, टीम इंडियासमोर मोठं आव्हान
Follow us
| Updated on: Dec 27, 2024 | 8:27 AM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या दृष्टीने महत्वाच्या सामन्यात टीम इंडिया अडचणीत आली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्याच डावात 474 धावांचा डोंगर रचला आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार आहे. कारण भारताने ही धावसंख्या पार केली नाही किंवा फॉलोऑन टाळला नाही तर पराभव निश्चित आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठणं जवळपास अनिश्चित होऊन जाईल. चौथ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांना खेळपट्टीचा अंदाज होता. ही खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभी राहणार हे दोन्ही संघांना माहिती होतं. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न होता. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीनंतर ही बाब अधोरेखित केली होती. पण भारताने नाणेफेक गमवल्याने वाटेला गोलंदाजी आली. तसेच खेळपट्टी आणि होम ग्राउंडचा फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला. ऑस्ट्रेलियाने सर्वबाद धावा केल्या.

भारताकडून रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी चांगला स्पेल टाकला. बुमराहने 4 आणि जडेजाने  3 गडी बाद केले. तर आकाशदीपला दोन गडी बाद करण्यात यश आलं. वॉशिंग्टन सुंदरने एक गडी बाद केला.  मोहम्मद सिराज आणि नितीश कुमार रेड्डी यांची झोळी रिती राहिली. दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून तीन जणांनी अर्धशतकी खेळी केली. सॅम कोनस्टासने 60, उस्मान ख्वाजाने 52, मार्नस लाबुशेनने 72 धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्ध या मालिकेत सलग दुसरं शतक ठोकलं. त्याने 197 चेंडूंचा सामना करत 140 धावा केल्या. तर कर्णधार पॅट कमिन्सचं अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकलं. त्याने 63 चेंडूत 49 धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.