सुनील गावस्कर यांना पाहताच भावुक झाले नितीश कुमार रेड्डीचे वडील, पाहा इमोशनल Video
मेलबर्नच्या एमसीजी मैदानात टीम इंडियाची नाजूक स्थिती असताना नितीश कुमार रेड्डीने डाव सावरला. भारताची 191 धावांवर 6 गडी बाद अशी स्थिती असातना नितीश मैदानात उतरला होता. शतकी खेळी करून त्याने 369 धावांपर्यंत टीम इंडियाला पोहोचवलं.
मेलबर्न कसोटीत नितीश कुमार रेड्डीने खेळलेली खेळी कायम स्मरणात राहणारी राहील. एकीकडे भारतावर एक डावाने सामना गमवण्याची वेळ आली होती. पण नितीश कुमार रेड्डीने आठव्या विकेटसाठी साजेशी कामगिरी केली. तसेच शतक झळकावून टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं. मुलाची शतकी खेळी पाहून वडील मुत्याला रेड्डी हे देखील भावुक झाले. त्यांच्या अश्रूंचा बांध मैदानात फुटला. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, नितीश कुमार रेड्डीने या सामन्यात 114 धावा केल्या. नितीश कुमारच्या या खेळीनंतर मुत्याला रेड्डी यांची भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याशी भेट झाली. यावेळी त्यांना पाहताच नितीशच्या वडिलांनी त्यांचे पाय धरले.
मुलाखतीत नितीशचे वडील खूपच भावुक झाले होते. नितीशचं क्रिकेट करिअर पुढे नेण्यासाठी केलेल्या मदतीसाठी आभार मानले. यावेळी गावस्कर यांच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यांनी सांगितलं की, मुत्याला यांच्या त्यागामुळेच भारताला नितीश कुमार रेड्डीसारखा हिरा मिळाला आहे. सुनील गावस्कर यांनी सांगितलं की, ‘आम्हाला माहिती आहे त्यांनी किती त्याग केला आहे. त्यांनी खूप संघर्ष केला आहे. तुमच्यामुळे मला अश्रू अनावर झाले. तुमच्यामुळे भारताला एक हिरा मिळाला.’ एमसीजीच्या बॅकरूमध्ये हे भावुक क्षण कॅमेऱ्यात कैद झाले.
Nitish Kumar Reddy’s family meet the great Sunil Gavaskar @abcsport #AUSvIND pic.twitter.com/hUBOghxM2e
— Ben Cameron (@BenCameron23) December 29, 2024
नितीशच्या आईने सुनील गावस्कर यांना सांगितलं की, मला विश्वास बसत नाही की माझा मुलगा इतक्या मोठ्या मैदानात खेळत आहे. तसेच इतकी मोठी खेळी केली. दुसरीकडे, नितीशची खेळी पाहून रवि शास्त्रीही भावुक झाले होते. त्यांनी सांगितलं की ही खेळी पाहून डोळ्यात अश्रू आले. आठव्या विकेटसाठी नितीशने 189 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 114 धावा केल्या आणि बाद झाला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात कमबॅक केलं आहे. त्यामुळे हा सामना ड्रॉ करण्याशिवाय टीम इंडियाकडे पर्याय नाही.