बॉक्सिंग कसोटी सामन्यात रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय, असं झालं तर…
बॉक्सिंग कसोटी सामना सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. आर अश्विनने निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या जागी तनुष कोटियन संघात आला आहे. दुसरीकडे, चौथ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या मनात घालमेल सुरु आहे. त्यात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ख्रिसमसच्या एक दिवसानंतर सुरु होणाऱ्या सामन्याला बॉक्सिंग डे कसोटी म्हंटलं जातं. हा कसोटी सामना दोन्ही संघांना मालिका आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघांची विजयासाठी धडपड आहे. भारताने हा सामना जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकेल. त्यामुळे काहीही करून भारताला या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. दुसरीकडे, अशीच स्थिती ऑस्ट्रेलियाची आहे. त्यामुळे या सामन्याला महत्त्व आलं आहे. दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. रोहित शर्मा दुसऱ्या कसोटी सामन्यापासून टीम इंडियासोबत आहे. दुसऱ्या कसोटीत पराभव, तर तिसऱ्या कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पण या दोन्ही कसोटी सामन्यात रोहित शर्मा काही खास करू शकला नाही. अशा स्थितीत रोहित शर्मा मोठा निर्णय घेण्याचा तयारीत आहे.
संघाची घडी विस्कटू नये म्हणून विनिंग कॉम्बिनेशन ठेवण्याचा निर्णय दुसऱ्या कसोटीपासून रोहित शर्माने घेतला होता. त्या दृष्टीने रोहित शर्मा मधल्या फळीत फलंदाजीसाठी उतरत होता. पण मधळ्या फळीत त्याची फलंदाजी काही खास राहिली नाही. एकेरी धावा करूनच तंबूत परतत होता. त्यामुळे रोहित शर्मा बॉक्सिंग कसोटी सामन्यात ओपनिंग करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत केएल राहुलला तिसऱ्या स्थानावर किंवा मधल्या फळीत फलंदाजी करावी लागू शकते.
कर्णधार रोहित शर्मा चौथ्या कसोटीसाठी प्लेइंग 11 मध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे. कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या मैदानावर 14 सामने खेळले आहेत. यात फक्त 4 सामने भारताने जिंकले आहेत. आठ सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. तर दोन सामने ड्रॉ झाले आहेत. मेलबर्नमध्ये फिरकीपटूंना थोडीफार मदत मिळते. भारतीय संघाचं हे प्रमुख अस्त्र आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया एका अतिरिक्त फिरकीपटूसह मैदानात उतरू शकते.
मेलबर्न कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.