IND vs AUS | चौथ्या कसोटीत श्रेयस अय्यर याच्या जागी सूर्यकुमार यादव बॅटिंग करणार?

श्रेयस अय्यर याच्या दुखापतीचं स्कॅनिंग करण्यात आलय. अय्यरवर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.

IND vs AUS  | चौथ्या कसोटीत श्रेयस अय्यर याच्या जागी सूर्यकुमार यादव बॅटिंग करणार?
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 5:03 PM

अहमदाबाद | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु आहे. टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियासाठी चौथा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने अत्यंत महत्वाची आहे. मात्र त्याआधी चौथ्या दिवशी टीम इंडियाचा बॅट्समन श्रेयस अय्यर याच्या जुन्या दुखापतीचा पन्हा त्रास जाणवला. त्यामुळे श्रेयस अय्यर याला बॅटिंगसाठी येता आलं नाही. दरम्यान त्याच्या जागी आता प्लेइंग इलेव्हनमध्ये नसलेला सूर्यकुमार यादव बॅटिंगसाठी येऊ शकतो का, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

कन्कशन नियनानुसार खेळाडूंची अदलाबदल केली जाते. आयसीसीकडून 1 ऑगस्ट 2019 पासून हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादव याला संधी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या नियमानुसार, सूर्यकुमार यादव याला संधी मिळणार का, असा प्रश्न एका चाहत्याने ट्विटरवर विचारला. या प्रश्नाला टीम इंडियाचे माजी क्रिकेटर संजय बांगर यांनी उत्तर दिलं.

कन्कशन नियनानुसार खेळाडूच्या डोक्याला बॉल लागला असेल, तरच हा नियम लागू होतो. त्यामुळे श्रेयस अय्यर याच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह सामन्यादरम्यान कॉमेंट्री करताना बांगर यांनी हे उत्तर दिलं. क्रिकेट चाहते #AskTheExpert या हॅशटॅगने आपले प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांना कॉमेंटेटर उत्तर देतात.

हे सुद्धा वाचा

कन्कशन नियनानुसार, जर फलंदाजाला दुखापत झाली असेल तर त्याच्या जागी फलंदाजाचाच समावेश केला जातो. म्हणजे दुखापत बॉलरला झाली असेल तर त्याच्या जागी बॅट्समनचा समावेश करता येत नाही

दरम्यान बांगर यांच्या उत्तरामुळे हे स्पष्ट झालं की कन्कशनचा नियम श्रेयस अय्यरच्या बाबतीत लागू होत नाही. दरम्यान टीम इंडियाने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने केलेल्या 480 धावांचा टप्पा ओलांडून 90 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.