IND vs AUS 5th T20 Pitch Report | गोलंदाज की फलंदाज, बंगळुरुची पिच कोणसाठी फायदेशीर?
IND vs AUS 5th T20 Pitch Report | ऑस्ट्रेलिया क्रिकेट भारत दौऱ्यातील अखेरचा टी 20 सामना हा रविवारी 3 डिसेंबर रोजी खेळणार आहे. हा सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात पीच आणि वेदर रिपोर्ट कसं असेल जाणून घ्या.
बंगळुरु | टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची 5 सामन्यांची टी 20 मालिका जिंकली आहे. टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. तर मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हा रविवारी 3 डिसेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सूर्यकुमार यादव हा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर मॅथ्यु वेड याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची सूत्र आहेत. बंगळुरुतील खेळपट्टी ही गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार की फलंदाजांसाठी हे आपण जाणून घेऊयात.
बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममधील खेळपट्टी ही गोलंदाज आणि फलंदाजांसाठी अनुकूल आहे. टीम इंडियाने याच स्टेडियममध्ये वर्ल्ड कपमधील सामना खेळला होता. येथील सामने हायस्कोअरिंग झाले होते. टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यात असंच चित्र पाहायला मिळू शकतं. या सामन्यात मधल्या ओव्हरमध्ये स्पिनर्स निर्णायक भूमिका बजावू शकतात. मात्र दवामुळे फलंदाज याच स्पिनर्सची धुलाईही करु शकतात.
बंगळुरुतील टी 20 रेकॉर्ड
आतापर्यंत बंगळुरुत 8 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. या 8 पैकी 2 सामन्यात पहिले बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. तर 5 वेळा दुसऱ्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाला आहे. त्यामुळे या पीचवर टॉस जिंकून पहिले फिल्डिंग करण्याचा कळ असतो.
वेदर रिपोर्ट
बंगळुरुत सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण असेल. मात्र त्यानंतरही पाऊस सामन्यात खोडा घालू शकतो. सामन्याच्या दरम्यान कमाल तापमान हे 22 ते 23 डिग्री सेल्सियस असू शकतं.
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, अॅरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा, नॅथन एलिस आणि केन रिचर्डसन.