IND vs AUS | टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा 4 वर्षांपूर्वीचा हिशोब क्लिअर

INDIA vs AUSTRALIA | टीम इंडियाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये कांगारुंकडून पराभूत व्हावं लागलं. मात्र 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात कांगारुना लोळवून टीम इंडियाने 4 वर्षांपूर्वीचा बदला घेतला.

IND vs AUS | टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा 4 वर्षांपूर्वीचा हिशोब क्लिअर
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 10:03 PM

बंगळुरु | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाची 4 वर्षानंतर परतफेड केली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पाचव्या टी 20 सामन्यात 6 धावांनी पराभव केला. टीम इंडियाने या विजयासह मालिका 4-1 फरकाने जिंकली. या विजयासह टीम इंडियाने कांगारुंची उधारीही फेडली. याच कांगारुंनी याच चिन्नास्वामी स्टेडियममध्ये टीम इंडियाला पराभूत केलं होतं. आता टीम इंडियाने कांगारुंना लोळवून विषय बरोबरीत सोडवलाय आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांनाही एक वेगळं समाधान मिळालं आहे.

टीम इंडियाने श्रेयस अय्यर याच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर 161 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या 161 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 154 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाने 19 व्या ओव्हरपर्यंत शानदार कामगिरी केली. कांगारुंना अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 10 धावांची गरज होती. मात्र अर्शदीप सिंह याने अवघ्या 3 धावा देत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. सोबतच 4 वर्षांपूर्वीचा हिशोब क्लिअर झाला.

तेव्हा नक्की काय झालं होतं?

ऑस्ट्रेलियाने 4 वर्षांपूर्वी 2019 मध्ये चिन्नास्वामी स्टेडियममध्ये टीम इंडियाचा 7 विकेट्सने पराभव केला होता. टीम इंडियाने त्या सामन्यात 4 विकेट्स गमावून 190 धावा केल्या होत्या. विराटने तेव्हा 38 बॉलमध्ये 72 धावांची खेळी केली होती. तर धोनीने 40 धावांचं योगदान दिलं होतं. मात्र ऑस्ट्रेलिया हा सामना 7 विकेट्सने जिंकला. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल हा विजयाचा शिल्पकार ठरला. ग्लेन मॅक्सवेल याने 55 बॉलमध्ये 113 धावांची झंझावाती शतकी खेळी केली. मॅक्सवेलने तेव्हा 7 चौकार आणि 9 सिक्स ठोकले होते.

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चिन्नास्वामी स्टेडियममधील हा पहिला विजय ठरला. तसेच टीम इंडियाचा हा या स्टेडियममधील एकूण तिसरा विजय ठरला. टीम इंडियाने याआधी या स्टेडियममध्ये बांगलादेश आणि इंग्लंडला पराभूत केलंय.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), ट्रेव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, एरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.