IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टॉस होताच जसप्रीत बुमराहने रोहित शर्माबाबत खरं काय ते सांगितलं, म्हणाला..

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. या सामन्यात रोहित शर्मा नसल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. नेमकं असं का झालं वगैरे वगैरे..असं असताना कर्णधारपदाची धुरा असलेल्या जसप्रीत बुमराहने मन मोकळं केलं.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टॉस होताच जसप्रीत बुमराहने रोहित शर्माबाबत खरं काय ते सांगितलं, म्हणाला..
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 4:21 PM

ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातील टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर होती. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात आला आणि त्याने सूत्र हाती घेतली. त्यानंतर जे काही घडलं ते सर्वांनाच माहिती आहे. दुसरा कसोटी सामना गमवला, तिसरा सामना ड्रॉ आणि चौथ्या सामन्यात पुन्हा पराभव झाला. त्यामुळे मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 ने आघाडी घेतली. दुसरीकडे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं स्वप्नही लांबलं. असं असताना पाचव्या कसोटीपूर्वी बरंच काही घडल्याचं सांगण्यात येत आहे. रोहित शर्मा प्लेइंग 11 मध्ये नसल्याच्या वावड्या उठल्या. पण या वावड्यांना टॉस करण्यासाठी जसप्रीत बुमराह आल्याने मोहोर लागली. जसप्रीत बुमराहने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच रोहित शर्मा संघात का नाही? याबाबत ही स्पष्टीकरण दिलं.

जसप्रीत बुमराहने सांगितलं की, आम्ही नक्कीच चांगले क्रिकेट खेळलो. मागचा सामना रोमांचक होता. या मैदानावर जास्त गवत दिसत नाही. दरम्यान, पराभव पचवायला शिकणं गरजेचं आहे. आता जे काही झालं ते मागे सोडून पुढे जात आहोत.’ रोहित शर्माबाबत जसप्रीत बुमराहने सांगितलं की, ‘आमच्या कर्णधाराने विश्रांतीचा पर्याय निवडला आहे. असा निर्णय करून त्याने लीडरशीप दाखवली आहे यातून एकजूट दिसते. आमच्या संघात कोणताच स्वार्थ नााही. जे काही आम्ही करत आहोत ते संघाचं हित पाहूनच करत आहोत. आमच्या संगात दोन बदल आहेत. रोहित शर्मा नसल्याने गिलला घेतलं आहे. तर जखमी आकाश दीपसाठी प्रसिद्ध कृष्णा संघात आला आहे.’ दरम्यान या कसोटी सामन्यानंतर रोहित शर्मा निवृत्त होईल असं सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे, टीम इंडियाने पहिल्याच दिवशी निराशाजनक कामगिरी केली. टीम इंडियाचा संपूर्ण संघ 185 धावांवर तंबूत परतला. तर ऑस्ट्रेलियाने 9 धावांवर एक गडी गमवला आहे. अजूनही ऑस्ट्रेलिया 176 धावांनी पिछाडीवर असून 9 गडी हाती आहेत. हा सामना टीम इंडियासाठी करो या मरोची लढाई आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला की थेट अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): सॅम कोन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), प्रसीद कृष्णा, मोहम्मद सिराज

लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....