INDvsAUS | तिसऱ्या कसोटीआधी टीम मॅनेजमेंटचा मोठा निर्णय,थेट कॅप्टनच बदलला
तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया नेट्समध्ये जोरदार सराव करत आहे. मात्र त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे.
इंदूर | बॉर्डर गावसकर ट्रॉफीत टीम इंडियाने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात नागपूर आणि दिल्ली कसोटीत कांगारुंवर शानदार विजय मिळवला. टीम इंडिया या 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. टीम इंडियाचं आता तिसरा कसोटी सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचं तिकीट मिळवण्याचा उद्देश आहे. तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया जोरदार सराव करत आहे. मात्र त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियाला या मालिकेत पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र त्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलयाचा कर्णधार पॅट कमिन्स तिसऱ्या कसोटीतून आऊट झाला आहे. पॅटच्या आईची प्रकृती स्थिर नसल्याने त्याने तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. याआधी पॅट इंदूर कसोटीआधी उपलब्ध होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता पॅटला ते शक्य नाही.
आईची प्रकृती चिंताजनक असल्याने पॅट मायदेशी परतणार आहे. तो सिडनीतच थांबणार आहे. “आता मी भारतात परतणार नाही. अशा गरजेच्या वेळेस मी कुटुंबासोबतच थांबेन”, असं पॅटन स्पष्ट केलं. टीम मॅनेजमेंटने केलेल्या सहकार्यासाठी पॅटने आभार मानले.
पॅट कमिन्स तिसऱ्या कसोटीतून आऊट
JUST IN: Pat Cummins will remain home for the third #INDvAUS Test in Indore after he this week returned to Sydney due to a family illness | @LouisDBCameron https://t.co/zlAXrSclc5 pic.twitter.com/COIpgKUpfD
— cricket.com.au (@cricketcomau) February 24, 2023
कर्णधारपदाची जबाबदारी कुणाकडे?
पॅटच्या अनुपस्थितीत अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. स्टीव्हने याआधी ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद सांभळलंय. मात्र काही वर्षांपूर्वी स्टीव्हला सँड पेपर वादात आपलं कर्णधारपद गमवावं लागलं होतं.
स्टीव्हचा कसोटी कर्णधारपदाचा अनुभव
स्टीव्हने एकूण 36 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाची कॅप्टन्सी केलीय. यातील 20 सामन्यात पॅटने ऑस्ट्रेलियाला विजयी केलं आहे. स्टीव्हकडे कॅप्टन्सीचा अनुभव आहे. त्यामुळे आता स्टीव्ह ऑस्ट्रेलियाला या मालिकेत पहिला विजय मिळवून देणार का, याकडे ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तिसरा कसोटी सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये 1-5 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलियामागे दुखापतीचं ग्रहण
दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमागे दुखापतीचं ग्रहण लागलंय. तर काही खेळाडू हे मायदेशी परतलेत. डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे सीरिजमधून बाहेर पडला.हेझलवूड ऑस्ट्रेलियातून आला तसाच एकही सामना न खेळता परतला. मॅथ्यू रेनशॉ यालाही इंज्युरीमुळे मायदेशी परतावं लागलं. एश्टन एगर यालाही रिलीज करण्यात आलं. आता कॅप्टन पॅट कमिन्स हा देखील तिसऱ्या सामन्यात नसणार. त्यामुळे ऑस्ट्रेलिया चांगलीच अडचणीत आली आहे.
तर तिसऱ्या कसोटीआधी कॅमरुन ग्रीन कमबॅक करु शकतो. कॅमरुन याला दुखापतीमुळे पहिल्या 2 कसोटींना मुकावं लागलं होतं. आता ग्रीन पूर्णपणे फीट आहे. त्यामुळे तो इंदूर टेस्टमध्ये खेळू शकतो.
तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.