INDvsAUS | टीमसाठी वाईट बातमी, कॅप्टन वनडे सीरिजमधून बाहेर होणार!

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेनंतर 3 सामन्यांची वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही मालिकेतून खेळाडू आऊट होणार असल्याची शक्यता आहे.

INDvsAUS | टीमसाठी वाईट बातमी, कॅप्टन वनडे सीरिजमधून बाहेर होणार!
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 5:06 PM

मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये 1 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे. याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. एक घातक खेळाडू हा उर्विरत कसोटीसह वनडे सीरिजमधूनही बाहेर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

चौथी टेस्ट आणि वनडे सीरिजमधून आऊट?

टीम इंडिया 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. या मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स याने कौटुंबिक कारणामुळे तिसऱ्या सामन्यातून माघार घेतली आहे. आता पॅट चौथ्या कसोटी आणि वनडे सीरिजलाही मुकण्याची शक्यता असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय.

पॅटच्या आईची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटने पॅटला तिसऱ्या कसोटीआधी मुक्त केलं. कुटुंब अडचणीत असल्याने पॅटला मॅनेजमेंटने रिलीज केलं. मात्र आता पॅटच्या आईची प्रकृती गंभीर असल्याने त्याला परतणं शक्य नसल्याचं म्हटलं जातंय. यामुळे पॅटला वनडे मालिकेतही सहभागी होता येणार नसल्याचं म्हटलं जातंय.

कॅप्टन्सी कुणाला मिळणार?

पॅटने तिसऱ्या कसोटीतून माघार घेतल्याने स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. त्यात आता पॅट चौथी कसोटी आणि वनडे सीरिजमध्ये खेळणार नसल्याचं समजतंय. त्यामुळे कसोटीनंतर एकदिवसीय मालिकेतही स्मिथकडे नेतृत्वाची सूत्रं दिली जाऊ शकतात.

दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये उपलब्ध नसणार आहे. रोहित कौटुंबिक कारणामुळे पहिल्या सामन्यात उपलब्ध नसल्याची माहिती, बीसीसीआयने ट्विटद्वारे दिली. त्यामुळे या पहिल्या वनडेत हार्दिक पंड्या भारताचं कर्णधारपद सांभणाळणार आहे.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिली वनडे, 17 मार्च, मुंबई

दुसरी वनडे, 19 मार्च, विशाखापट्टणम

तिसरी वनडे, 22 मार्च, चेन्नई

वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम

पॅट कमिन्स (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मिचेल मार्श, झाई रिचर्डसन, सेन एबॉट, कॅमरन ग्रीन, एस्टन एगर, एलेक्स कॅरी, ट्रेविस हेड, जोश इंग्लिश, मार्नस लाबुशेन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस आणि एडम झॅम्पा.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.