INDvsAUS | इंदूरमध्ये पराभव झाल्यास टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहचणार?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत आहे. रोहितसेनेसाठी Wtc Final च्या हिशोबाने ही मॅच महत्वाची आहे.
इंदूर | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरमध्ये तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाची अपेक्षित सुरुवात राहिली नाही. टीम इंडियाचा पहिला डाव सामन्याच्या पहिल्याच दिवशी 109 धावांवर आटोपला. त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी जोरदार कमबॅक करत कांगारुंना 197 धावांवर ऑलआऊट करत फक्त 88 धावांचीच आघाडी घेऊ दिली.
इंदूरमध्ये टीम इंडियाचं गणित बिघडणार?
टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने इंदूर टेस्ट फार महत्वाची आहे. टीम इंडिया हा सामना जिंकल्यास थेट wtc फायनलसाठी पात्र ठरेल. तर पराभव झाल्यास टीम इंडियाला फायनलमध्ये पोहचण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल. इंदूर कसोटी गमावल्यास टीम इंडियाला wtc फायनलमध्ये पोहचण्यासाठी कोणत्याही स्थितीत अहमदाबादमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरिज 2-1 ने जिंकल्यास किंवा 2-2 ने सीरिज ड्रॉ राहिल्यास टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका मालिकेवर अवलंबून रहावं लागेल. टीम इंडियाला फायनलसाठी श्रीलंकेचा न्यूझीलंड विरुद्ध 2 पैकी किमान 1 सामन्यात पराभव होणं गरजेचं आहे. न्यूझीलंडसारख्या तगड्या टीमचा त्यांच्याच घरात पराभव करणं हे आव्हानात्मक आहे.
ऑस्ट्रेलियाला सामना ड्रॉ करण्याची गरज
ऑस्ट्रेलियासाठी Wtc Final साठीचं समीकरण तयार आहे. ऑस्ट्रेलियाला टीम इंडिया विरुद्धच्या उर्वरित 2 म्हणजेच इंदूर आणि अहमदाबाद कसोटीपैकी एका सामन्यात पराभव टाळायचा आहे. थोडक्यात सांगायचं तर ही मालिका 3-1 किंवा 3-0 ने गमावली तरीही ऑस्ट्रेलिया फायनलसाठी पात्र ठरेल.
तसेच ऑस्ट्रेलियाचा या दोन्ही सामन्यात पराभव झाल्यास तिथे श्रीलंकेला न्यूझीलंड विरुद्ध 2-0 अशा फरकाने विजय मिळवावा लागेल. श्रीलंकेला ही कामगिरी जमली नाही, तर टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भिडतील. हा फायनल सामना 7 जून रोजी ओव्हल मैदानात खेळवण्यात येणार आहे.
तिसऱ्या कसोटीचा धावता आढावा
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पहिल्या डावात 109 धावांवर रोखलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 88 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात टीम इंडियाने 88 धावा पूर्ण करत 50 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवनन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुह्नमैन.