INDvsAUS| टीम इंडियात 2 घातक फलंदाजांची एन्ट्री, ऑस्ट्रेलियाला रडवणार ही प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अरुण जेटली स्टेडियममध्ये दुसरा कसोटी सामना 17-21 फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
मुंबई : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. टीम इंडियाने पहिला कसोटी सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. टीम इंडियाने पहिला सामना हा 132 धावांनी जिंकला. आता टीम इंडियाचं लक्ष हे दिल्लीत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याकडे आहे. टीम इंडिया दुसरा सामना जिंकून मालिकेत एकतर्फी आघाडी घेण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. मात्र दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन तितकाच महत्वाचा भाग आहे.
ऑस्ट्रेलियाचा पहिल्या सामन्यात पराभव झाला. मात्र ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाच्या उणीवा लक्षात आल्या असतील. केएल राहुल टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरतोय. केएलने पहिल्या सामन्यात केवळ 20 धावाच केल्या. त्यामुळे कॅप्टन रोहित दुसऱ्या कसोटीत शुबमनला संधी देऊ शकतो.
अय्यरची टीममध्ये एन्ट्री
गोलंदाजांच्या कामगिरीसमोर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांची फ्लॉप कामगिरीकडे कुणाचं लक्ष गेलं नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होऊ शकतात. श्रेयस अय्यरचं दुखापतीनंतर कमबॅक झालं आहे. त्यामुळे श्रेयस याला संधी मिळाल्यास सूर्यकुमारला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी केली. त्यामुळे टीम इंडिया विनिंग स्क्वॉड कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. अक्षर पटेल, रविंद्र जडेजा आणि आर अश्विन हे तिघेही पुन्हा कहर करण्यासाठी सज्ज आहेत. तर कुलदीप यादव याला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर व्हावं लागू शकतं.
पहिल्या कसोटीत रविंद्र जडेजा याने कमबॅक केलं. जडेजाने पहिल्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. जडेजाने दोन्ही डावात मिळून एकूण 7 विकेट्स घेतल्या. तसेच 70 धावाही केल्या. जडेजाने केलेल्या या कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ जाहीर करण्यात आलं.
टीम इंडिया संभावित प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.