IND vs AUS : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी चेतेश्वर पुजाराची एन्ट्री, कसोटीत मिळाली अशी जबाबदारी

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी तसं काही वाटत नव्हतं. पण न्यूझीलंडने 3-0 ने धोबीपछाड दिल्यानंतर या मालिकेचं महत्त्व वाढलं आहे. भारताला पाच सामन्यांची मालिका 4-0 ने जिंकणं भाग आहे.

IND vs AUS : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी चेतेश्वर पुजाराची एन्ट्री, कसोटीत मिळाली अशी जबाबदारी
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 2:29 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित ठरवणारी आहे. त्यामुळे या मालिकेकडे लक्ष लागून आहे. पहिला सामना पर्थच्या वाका स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे पण यावेळी संघात अनुभवी खेळाडूंची उणीव भासत आहे. तसेच न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमवल्याने दडपण वाढलं आहे. असं असताना अनुभवी चेतेश्वर पुजाराची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत एन्ट्री झाली आहे. या मालिकेत चेतेश्वर पुजारा नव्या भूमिकेत दिसणार आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-2024 मध्ये समालोचकाची भूमिका बजावणार आहे. या मालिकेत हिंदी समालोचन करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. चेतेश्वर पुजारा पहिल्यांदाच मालिकेत समालोचन करताना दिसणार आहे. चेतेश्वर पुजारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 अंतिम फेरीपासून टीम इंडियाचा भाग नाही. चेतेश्वर पुजाराला तेव्हापासून कोणत्याच फॉर्मेटमध्ये संघात स्थान मिळालेलं. चेतेश्वर पुजाराला संघातून वगळल्यानंतर त्याची जागा शुबमन गिलला मिळाली आहे.

चेतेश्वर पुजारा सध्या संघात नाही पण त्याची उणीव भासणार यात शंका नाही. कारण ऑस्ट्रेलियात त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात 2018-19 मध्ये झालेल्या कसोटीत चेतेश्वरची भूमिका महत्त्वाची होती. त्याच्या खेळीमुळे टीम इंडियाला विजय मिळवता आला होता. त्याला प्लेयर ऑफ द सीरिजने गौरविण्यात आलं होतं. तेव्हा चार कसोटीत त्याने 74.42 च्या सरासरीने 521 धावा केल्या होत्या. त्यानंतर झालेल्या मालिकेतही त्याने संघासाठी भक्कम फलंदाजी केली. दुखापत होऊनही त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना केला आणि धावा केल्या.

दरम्यान, चेतेश्वर पुजाराने अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. त्यात देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे. चेतेश्वर पुजारा टीम इंडियासाठी 103 कसोटी सामने खेळला असून 176 जावात फलंदाजी केली आहे. यात त्याने 7195 धावा केल्या आहेत. 206 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. चेतेश्वर पुजाराने 19 शतकं आणि 35 अर्धशतक ठोकली आहेत. यात तीन द्विशतकांचा समावेश आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.