IND vs AUS | टीम इंडियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी माझे दोन हुकमी एक्के बास, पॅट कमिन्सने डिवचलं
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेला दोन महिने बाकी आहेत, मात्र ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने त्याआधी मोठं वक्तव्य केलं आहे. टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न त्याने केल्याचं चाहते म्हणत आहेत. पण नेमकं तो काय बोलला जाणून घ्या.
श्रीलंका दौरा झाल्यावर आता टीम इंडिया बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेत मैदानात उतरताना दिसेल. यंदा वर्षाच्या शेवटी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचं आहे. कायम अटीतटीच्या या कसोटी मालिकेमध्ये क्रिकेट रसिकांसाठी पर्वणीच असते. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडियाला रोखण्यासाठी पूर्ण ताकद लावताना दिसतील. याआधी झालेल्या दोन दौऱ्यांमध्ये टीम इंडियाने मालिका जिंकल्याने विजयी मोहिमेला कांगारू थांबवण्यासाठी प्रतिकार करतील. अशातच ऑस्ट्रेलिया टीमचा कॅप्टन पॅट कमिन्स याने या मालिकेआधी दोन खेळाडूंबाबत मोठं विधान केलं आहे.
टीममध्ये असलेल्या ऑल राऊडंर खेळाडूचा खूप जास्त फायदा होता. मागील काही वर्षांमध्ये आम्हाला कॅमेरून ग्रीन आणि मिचेल मार्श यांचा जास्त काही उपयोग करता आला नाही. पण चांगली गोष्ट आहे, कारण आता टीम इंडियाविरूद्धच्या कसोटी मालिकेमध्ये त्यांच्यावर गोलंदाजीची अधिक जबाबदारी देऊ शकतो. शिल्ड क्रिकेटचा ग्रीन याला चांगला अनुभन असून त्याच्या नावावर अनेक विक्रमही आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने फार काही गोलंदाजी केलेली नाही. त्यामुळे खास करून ग्रीनवर जास्तीची जबाबदारी दिली जाऊ शकते, असं पॅट कमिन्स म्हणाला.
पॅट कमिन्सचा ग्रीनवर जास्त विश्वास असल्याचं त्याच्या सांगण्यावरून लक्षात आलं. कमिन्सला विचारण्यात आलं की, मिचेल मार्श आणि कॅमेरून ग्रीन यांच्यामध्ये कोणाला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळेल. यावर बोलताना, ग्रीन आणि मार्श यांच्या टीममध्ये असल्याने आम्हाला बॉलिंगमध्ये सहा पर्याय उपलब्ध होत आहेत. तर नॅथन लियॉन असा गोलंदाज आहे जो एकटा मोठा स्पेल टाकू शकतो. त्यामुळे आमच्यासाठी ही चांगली गोष्ट असल्याचं कमिन्स म्हणाला.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर गावसकर ट्रॉफी ही पाच सामन्यांची मालिका असणार आहे. ही मालिका २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना २२-२६ नोव्हेंबर, दुसरा कसोटी सामना ६-१० नोव्हेंबर, तिसरा कसोटी सामना १४-१८ नोव्हेंबर, चौथा कसोटी सामना २६-३० नोव्हेंबर आणि अखेरचा सामना ३-७ जानेवारीपर्यंत असणार आहे.