IND vs AUS Final : सन्नाटाssss! ऑस्ट्रेलियाने या ठिकाणी तयार केलं प्रेशर, 1.3 लाख प्रेक्षकांची बोलती केली बंद

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना सुरु आहे. मोठ्या धावसंख्येची गरज असताना टीम इंडियाचे आघाडीचे खेळाडू झटपट बाद झाले. त्यामुळे सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची धाकधूक वाढली. काही क्षणी तर मैदानात एक भयाण शांतता पसरली होती.

IND vs AUS Final : सन्नाटाssss! ऑस्ट्रेलियाने या ठिकाणी तयार केलं प्रेशर, 1.3 लाख प्रेक्षकांची बोलती केली बंद
IND vs AUS Final : एकदम चिडीचूप...! या क्षणी भारतीय प्रेक्षक झाले गप्प, धाकधूक वाढवणारे क्षण
Follow us
| Updated on: Nov 19, 2023 | 5:55 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप जेतेपदासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताला रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली. मात्र काही क्षण असे आले की भारतीय प्रेक्षकांची बोलती बंद झाली. 1.3 लाख क्षमतेनं भरलेलं मैदान शांत झालं. सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने याबाबत भाकीत केलं होतं. काही अंशी ते खरं ठरलं. कारण प्रत्येक खेळात क्रीडाप्रेमींच्या भावना असतात. त्या त्या वेळी बदलत असतात. जेव्हा आक्रमक खेळी होत होती तेव्हा एकच जल्लोष होता. पण झटपट विकेट गेल्यानंतर दबाव वाढला आणि मैदानात भयाण शांतता पसरली. चला जाणून घेऊयात ऑस्ट्रेलियाने कुठे आणि कसा दबाव वाढवला ते…

रोहित शर्मा-शुबमन गिल जोडी मैदानात उतरली. यावेळी रोहित शर्माने आक्रमक खेळीने सुरुवात केली. पण संघांची धावसंख्या 30 असताना शुबमन गिल बाद झाला. तरी रोहित शर्माने आक्रमक अंदाज सोडला नाही. आक्रमकपणे चौकार आणि षटकार ठोकले. संघाची धावसंख्या 76 असताना रोहित शर्मा 47 धावा करून बाद झाला आणि मैदान शांत झालं.

श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर टीम इंडियावर दबाव वाढला आणि धाकधूक वाढली. कारण अवघ्या 4 धावांवर तो तंबूत परतला. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात अडचण आली. त्यामुळे श्रेयस बाद झाल्यानंतर शांतता पसरली.

विराट कोहली आणि केएल राहुल यांनी डाव सावरला. त्यामुळे प्रेक्षकांच्या आशा पुन्हा वाढल्या होत्या. पण ऐन मोक्याच्या क्षणी गरज असताना विराट कोहली बोल्ड झाला आणि पुन्हा एकदा मैदानातील आवाज बंद झाला. कारण पॅट कमिन्सने विराटला तंबूत पाठवलं होतं.

रविंद्र जडेजाही काही खास करू शकला नाही. केएल राहुलची साथ देण्याची खरी गरज असताना स्वस्तात बाद झाला. अवघ्या 9 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे मैदानात पुन्हा एकदा आवाज बंद झाला आहे.

सूर्यकुमार यादवकडून अपेक्षा होत्या. पण त्यालाही काही खास करता आलं नाही. स्लो पिचवर झटपट फटकेबाजी करणं कठीण झालं आणि 18 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे मैदानातातील जोश पूर्ण निघून गेला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.