IND VS AUS FINAL : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात या 11 खेळाडूंवर असेल नजर, पॉइंट्सच्या गणितात करतील मदत

India vs Australia World Cup 2023 Final Dream11 Team Prediction: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण पॉइंट्सच्या गणितात कोणते खेळाडू वरचढ ठरतील ते जाणून घेऊयात.

IND VS AUS FINAL : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात या 11 खेळाडूंवर असेल नजर, पॉइंट्सच्या गणितात करतील मदत
IND VS AUS FINAL :भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात हे 11 खेळाडू करतील मालामाल! जाणून घ्या
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 2:46 PM

मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ भिडणार आहेत. वर्ल्डकप इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम फेरीत हे दोन संघ समोरासमोर आले आहेत. 2003 आणि 2023 या 20 वर्षांच्या कालावधीत बरेच योगायोग जुळून आले आहेत. आता घडलेल्या घडामोडी तेव्हा बरोबर उलट घडल्या होत्या. तेव्हा ऑस्ट्रेलियाने 10 सामने सलग जिंकत, भारताने 8 सामने जिंकत अंतिम फेरी गाठली होती. तेव्हा साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. आता भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. असं बरंचसं गणित जुळून आलं आहे. वर्ल्डकप जेतेपदासाठी भारताला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. भारताने विजय मिळवल्यास तिसरं जेतेपद असणार आहे. भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडला 70 धावांनी पराभूत करत 2019 वर्ल्डकपचा वचपा काढला आहे. आता 2003 चा वचपा काढण्याची भारताकडे संधी आहे. या सामन्यात दोन्ही संघांच्या निवडक 11 खेळाडूंवर नजर असणार आहे.

विराट कोहली या स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात आहे. सर्वाधिक 711 धावा करत टॉपवर आहे. यात तीन शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे कर्णधार किंवा उपकर्णधारासाठी विराट कोहलीला पसंती दिली जाऊ शकते. त्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरही चांगली कामगिरी करत आहे. 10 सामन्यात 528 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तर हा पर्यायही कर्णधार किंवा उपकर्णधारासाठी योग्य ठरू शकतो. शेवटी त्या दिवशी कोणता खेळाडू चांगली कामगिरी करेल सांगता येत नाही.

ड्रीम इलेव्हन 1

  • विकेटकीपर : केएल राहुल
  • फलंदाज : रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुबमन गिल
  • अष्टपैलू : रवींद्र जडेजा, ग्लेन मॅक्सवेल
  • गोलंदाज : मिचेल स्टार्क, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

ड्रीम इलेव्हन 2

  • विकेटकीपर : केएल राहुल
  • फलंदाज : रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, विराट कोहली, मिचेल मार्श, शुबमन गिल
  • अष्टपैलू : रवींद्र जडेजा, ग्लेन मॅक्सवेल
  • गोलंदाज : मिचेल स्टार्क, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमेरून ग्रीन, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, एडम झाम्पा.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.