Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ind vs aus : “तिसऱ्या कसोटीमध्ये शुबमन गिल रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसेल”

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये तीन डावात अवघ्या 38 धावा करणाऱ्या के. एल. राहुलबाबत बड्या खेळाडूने मोठं वक्तव्य केलं आहे.

ind vs aus : तिसऱ्या कसोटीमध्ये शुबमन गिल रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसेल
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 9:08 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीआधी बीसीसीआयने उर्वरित कसोटीसाठी संघ जाहीर केला आहे. यामध्ये गेल्या काही दिवसांपासून फॉर्ममध्ये नसलेला भारताचा सलामीवीर के. एल. राहुलवरून निवड समितीला धारेवर धरलं जात आहे. राहुलला अजून किती संधी दिल्या जाणार आहेत? असा सवाल क्रीडा चाहत्यांनी केला. राहुलला संघाने अनेकवेळा संधी दिली मात्र त्याला काही चमकदार कामगिरी करता आली नाही. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये तीन डावात एकूण 38 धावा केल्या होत्या. राहुलचं उपकर्णधारपद काढून घेण्यात आलं आहे. तिसऱ्या कसोटीमध्येही राहुलला खेळवणार नाही यावर अनेकजण आपलं मत व्यक्त केलं आहे. अशातच भारताचा माजी कर्णधार हरभजन सिंहने मोठं वक्तव्य केलं आहे.

मला वाटतं की राहुलला संघातून वगळलं जाईल, कारण संघ व्यवस्थापनाने त्याला उपकर्णधारपदारून हटवलं आहे. त्यामुळे आता त्याला संघातून बाहेर बसवणं सोपं होणार आहे. एखाद्या खेळाडूला तो संघाचा उपकर्णधार किंवा कर्णधार असेल तर त्याला अंतिम अकरातून बाहेर काढणं अवघड जात असल्याचं हरभजन सिंहने म्हटलं आहे.

के. एल. राहुल हा एक दर्जेदार खेळाडू आहे. मात्र आता तो त्याच्या खराब पॅचमधून जात आहे. त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीयेत पण मला माहित आहे की तो चांगल्या प्रकारे दर्जेदार कमबॅक करेल. तिसऱ्या कसोटीमध्ये शुबमन गिल रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसेल, असंही भज्जीने म्हटलं आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये शुबमन गिलला संधी मिळणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उर्वरित कसोटी मालिकेचं वेळापत्रक तिसरी कसोटी, 1-5 मार्च, इंदूर चौथी कसोटी, 9-13 मार्च,

वनडे सीरिज पहिली वनडे, 17 मार्च, मुंबई दुसरी वनडे, 19 मार्च, विशाखापट्टणम तिसरी वनडे, 22 मार्च, चेन्नई या तिन्ही सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.