IND vs AUS | 0,0,0, ईशान, रोहितनंतर श्रेयसही झिरोवर आऊट, कांगारुंचं सॉल्लिड कमबॅक
Ishan Rohit And Shreyas Duck India vs Australia Icc World Cup 2023 | ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 200 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर रोहित-ईशान सलामी जोडीकडून आक्रमक सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र ईशान रोहित आणि श्रेयस या तिघांनी निराशा केली.
चेन्नई | टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये शानदार सुरुवात केली. फिरकी आणि वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 199 धावांवर ऑलआऊट केलं. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 200 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाच्या फिरकीने 6 आणि वेगवान गोलंदाजांनी 4 विकेट्स घेतल्या. त्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांवर टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी होती. त्यानुसार 200 धावांच्या पाठलागासाठी कॅप्टन रोहित शर्मा मैदानात आला. शुबमन गिल याच्या अनुपस्थितीत ईशान किशन सलामीला आला. तर मिचेल स्टार्क पहिली ओव्हर टाकण्यासाठी सज्ज झाला.
मिचेल स्टार्क पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट्स घेण्यासाठी ओळखला जातो. स्टार्कने ही ओळख सार्थ ठरवत टीम इंडियाला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. ईशान किशन याला आपल्या पहिल्यात बॉलवर नको तो फटका मारण्याचा धाडस भोवलं. ईशान किशन मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झिरोवर स्लिपमध्ये कॅच आऊट झाला. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये जोश हेझलवूड याने टीम इंडियाचा बाजार उठवला.
जोश हेझलवूड याने टीम इंडियाच्या डावातील दुसऱ्या आणि त्याच्या स्पेलमधील पहिल्याच ओव्हरमध्ये कॅप्टन रोहित शर्मा याला एलबीडब्लयू आऊट केलं. अंपायरने दिलेल्या निर्णयाला आव्हान देत रोहितने डीआरएस घेतला. मात्र रोहितला मैदानाबाहेर जावं लागलं. रोहितलाही खातं खोलता आलं नाही. त्यानंतर श्रेयस अय्यर मैदानात आला. मात्र श्रेयसलाही मैदानाबाहेर जाण्याची घाई होती. श्रेयसने टीम इंडियाची परिस्थिती न पाहता फटका मारला आणि तो ही झिरोवर आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाची 1.5 ओव्हरमध्येच 3 बाद 2 अशी वाईट स्थिती झाली. ऑस्ट्रेलियाने अशा प्रकारे टीम इंडियाला पिछाडीवर टाकत सामन्यात कमबॅक केलं.
विराट-केएलवर मदार
दरम्यान टीम इंडियाने पहिले 3 विकेट्स झटपट गमावल्या. त्यामुळे आता चेज मास्टर विराट कोहली आणि विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल या दोघांवर मोठी जबाबदारी असणार आहे. हे दोघे ऑस्ट्रेलियाच्या माऱ्याचा कसा सामना करतात हे पाहावं लागेल.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.