Virat Kohli | शतक हुकल्यानंतर संतापलेल्या विराट कोहली याने ड्रेसिंग रुममध्ये काय केलं? व्हीडिओ व्हायरल
Virat Kohli Dressing Room Viral Video | विराट कोहली टीम इंडियाच्या वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्यातील विजयाचा हिरो ठरला. विराटने निर्णायक खेळी करत टीम इंडियाला तारलं. मात्र विराटने ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर काय केलं बघा.
चेन्नई | टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं 200 धावांचं आव्हान हे 4 विकेट्सने विजय मिळवला. या 200 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची नाजूक स्थिती झाली. शुबमन गिल याच्या जागी संधी मिळालेला ईशान किशन याने निराशा केली. वर्ल्ड कपमधील पहिलाच सामना खेळणारा ईशान अपयशी ठरला. ईशान किशन झिरोवर आऊट झाला. मिचेल स्टार्क याने ईशानला झिरोवर आऊट केलं. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये जोश हेझलवूड याने कॅप्टन रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या दोघांनाही खातं उघडून दिलं नाही. त्यामुळे 200 धावांचं आव्हानही टीम इंडियासाठी अवघड झालेलं. मात्र त्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली या दोघांनी टीम इंडियासाठी संकटमोचकाची भूमिका ठरली.
ईशान, रोहित आणि श्रेयस झिरोवर आऊट झाल्याने टीम इंडियाची स्थिती 3 बाद 2 धावा अशी झाली. त्यानंतर केएल आणि विराट या दोघांनी टीम इंडियचा गाडा हाकला. यादोघांनी एक एक धाव जोडली. संधी मिळेल तेव्हा मोठे फटके मारले. टीम इंडियाचा डाव स्थिर केला. त्यानंतर वैयक्तिक अर्धशतकं पूर्ण केली. टीम इंडियाला संकटातून बाहेर ओढलं. विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. दोघांमध्ये 165 धावांची भागीदारी झाली. विराट 85 धावांवर खेळत होता. तर केएलही चांगली साथ देत होता.
आता हीच जोडी टीम इंडियाला विजयी करुन नाबाद परतणार, असं चित्र होतं. मात्र जोश हेझलवूड याने ही जोडी फोडली. हेझलवूड याने विराटला 85 धावांवर असताना मार्नल लबुशेन याच्या हाती कॅच आऊट केलं. विराटने 116 बॉलमध्ये 6 सिक्ससह 85 धावांचं योगदान दिलं. विराट आऊट झाला पण त्याने आपली भूमिका चोख बजावत टीम इंडियाला विजयाच्या दारात आणून सोडलं. तर दुसऱ्या बाजूला त्याचं शतक अवघ्या 15 धावांनी हुकलं.
मैदानातून बाहेर परतणाऱ्या विराटला स्टेडियममधील उपस्थितांनी उभे राहून अभिवादन केलं. विराटने त्यांचं अभिवादन स्वीकारलं. टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढल्याचं समाधान विराटला होतं. मात्र टीम इंडियाला विजयी करुन नाबाद परतणं न जमल्याची खंत विराटच्या चेहऱ्यावर दिसत होती. विराटने ड्रेसिंग रुममध्ये पोहचल्यानंतर आपल्या स्वत:वरची नाराजी व्यक्त केली. विराटची चिडचिड ही कॅमेऱ्यात कैद झाली. आता विराटचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विराट कोहली याचा व्हायरल व्हीडिओ
Kohli seems to be unhappy after missing that well deserved century.
. . .#IndVsAus #cwc23 #gambhir #ViratKohli #KLRahul pic.twitter.com/KWUT2nwkia
— SimplyTweet🗨 (@imhpv7) October 8, 2023
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.