IND vs AUS Test : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीज सुरु होण्यासाठी आता फक्त 3 दिवस उरलेत. 9 फेब्रुवारीला नागपूर येथे सीरीजमधला पहिला कसोटी सामना होईल. या टेस्ट सीरीजमध्ये टीम इंडियाला एका प्रमुख खेळाडूची उणीव जाणवेल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये त्याची सरासरी जबरदस्त आहे. तो या बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये खेळणार नाहीय. त्याची उणीव टीम इंडियाला खूप जाणवेल. त्याच्या आकड्यांवरुही ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. हा भारतीय प्लेयर कोण आहे? ते जाणून घ्या. या खेळाडूच नाव आहे ऋषभ पंत. मागच्यावर्षी रस्ते अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध उत्तम सरासरी
वर्ल्ड क्रिकेटमध्ये विद्यमान टेस्ट बॅट्समन्समध्ये ऋषभ पंतची ऑस्ट्रेलिया विरुद्ध उत्तम सरासरी आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऋषभची सरासरी 62 पेक्षा जास्त आहे. सध्या ऋषभ रुग्णालयात उपचार घेतोय.
मोठी सीरीज, मोठा प्लेयर
आता मोठी सीरीज आहे. मोठी संधी आहे. पण मोठा खेळाडू टीम इंडियाच्या बाहेर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध धोकादायक ठरणाऱ्या या प्लेयरच्या आकड्यांवर नजर मारा. ऋषभ पंतने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 7 टेस्ट मॅचमध्ये 12 इनिंगमध्ये 62.40 च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत. त्याने 2 अर्धशतकं आणि एक शतक झळकवलय. त्याचा स्ट्राइक रेट 72.13 चा आहे.
विद्यमान फलंदाजांमध्ये सर्वाधिक सरासरी
वर्ल्ड क्रिकेटमध्ये विद्यमान फलंदाजात ऋषभ पंतची सरासरी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक आहे. त्याच्यानंतर एक्टिव क्रिकेटर्समध्ये सरफराज अहमदची बॅटिंग सरासरी येते. त्याने 56.50 च्या सरासरीने धावा बनवल्यात. या यादीत तिसऱ्या स्थानावरही पाकिस्तानी फलंदाज आहे. इमाम-उल-हकची सरासरी 55.11 आहे. पुजारा चौथ्या नंबरवर आहे. त्याची बॅटिंग सरासरी 54.08 आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध कमीत कमी 5 टेस्ट मॅच खेळणारे हे क्रिकेटर्स आहेत.
पंतची जागा कोण घेणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये टीम इंडियाला ऋषभ पंतची कमतरता जाणवेल. अपघातामुळे ऋषभ पुढचे काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब रहाणार आहे. तो कधी पुनरागमन करेल, हे सांगता येत नाही. पण त्याच्याजागी टीममध्ये दुसऱ्या प्लेयरला संधी मिळेल. भारतीय टीम मॅनेजमेंटसमोर ऋषभचा पर्याय म्हणून केएल राहुल आहे. पहिल्या कसोटीत राहुल ऐवजी केएस भरतला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. इशान आणि केएस भरतमध्ये कोणाला संधी मिळते, ते लवकरच स्पष्ट होईल.