IND vs AUS : भारताला अजून एक धक्का, जाडेजा-विहारीनंतर दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीला मुकणार

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा पुढील काळात दुखापतींचा दौरा म्हणून ओळखला जाणार आहे. कारण या दौऱ्यात आणि दौऱ्यापूर्वी गेल्या दोन महिन्यात भारताचे तब्बल 12 खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत.

IND vs AUS : भारताला अजून एक धक्का, जाडेजा-विहारीनंतर दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीला मुकणार
जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) या निर्णयाची माहिती बीसीसीआयने ट्विटद्वारे दिली आहे.
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 10:17 AM

सिडनी : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा पुढील काळात दुखापतींचा दौरा म्हणून ओळखला जाणार आहे. कारण या दौऱ्यात आणि दौऱ्यापूर्वी गेल्या दोन महिन्यात भारताचे तब्बल 12 खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. दुखापतीमुळे जलदगती गोलंदाज इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव कसोटी मालिका खेळू शकले नाहीत. त्यानंतर सरावादरम्यान के. एल राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला भारतात परतावे लागले आहे. (IND vs AUS: Jasprit Bumrah ruled out of fourth Test against Australia)

तिसऱ्या कसोटी सामन्यात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारी दुखापतग्रस्त झाल्याने चौथा कसोटी सामना आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाहीत. जाडेजाचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे, तर हनुमा विहारीच्या मांडीचे स्नायू दुखावले आहेत. दोघांनाही आता रिहॅबिलिटेशनच्या प्रक्रियेतून जावं लागणार आहे. तसेच या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन जखमी झाले आहेत. पुढील सामन्यात हे दोघे खेळतील अथवा नाही, याबाबत शंका आहे.

या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. रिहॅबिलिटेशनची प्रक्रिया संपवून नुकताच तो भारतीय संघात सहभागी झाला आहे. त्यातच आता भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे. कारण भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळू शकणार नाही. PTI ने BCCI मधील सूत्रांच्या हवाल्याने बातमी दिली आहे की, बुमराह ब्रिस्बेन टेस्टमध्ये खेळू शकणार नाही. पोटाला झालेल्या दुखापतीमुळे तो चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे.

BCCI मधील सूत्रांनी सांगितले की, बुमराहला झालेली दुखापत गंभीर आहे. त्याच्या पोटाचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्वजण या स्कॅन रिपोर्टची वाट पाहात आहेत. बुमराह टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज आहे. तो फिट असणं संघासाठी खूप गरजेचं आहे. त्यामुळेच त्याला चौथ्या कसोटी सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. तसेच ऑस्ट्रेलियानंतर त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज व्हायचं आहे. त्यामुळेच त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मयंक अग्रवाललाही दुखापत

जडेजा, बुमराह आणि विहारीच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढलेल्या असताना टीम इंडियासमोर आणखी एक अडचण उभी राहिली आहे. नवोदित खेळाडू मंयक अग्रवालला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. त्याचेही स्कॅनिंग करण्यात आले आहे. सर्वांना आता त्याच्या स्कॅन रिपोर्टची प्रतीक्षा आहे. मयंकची दुखापत मोठी नसेल आणि तो चौथ्या कसोटीपूर्वी फिट झाला तर या कसोटी सामन्यात त्याला हनुमा विहारीच्या जागी संघात स्थान मिळू शकतं.

संबंधित बातम्या:

भारताला अजून एक धक्का, जाडेजानंतर हनुमा विहारी चौथ्या टेस्टला मुकणार

Aus vs Ind, 3rd Test | जाडेजा मैदानात न उतरल्याचा फायदा, कांगारुंचा लाजिरवाणा पराभव टळला

Australia vs India, 3rd Test, 5th Day Live : संकटमोचक हनुमा विहारीला अश्विनची साथ, तिसरी कसोटी ड्रॉ

‘तू तो देवमाणूस निकला रे’; दुखापतीनंतरही आक्रमक 97 फटकावणाऱ्या ऋषभ पंतवर कौतुकाचा वर्षाव

तू क्रिकेटची हत्या केलीस; भाजपचे खासदार महाशय हनुमा विहारीवर भडकतात तेव्हा…

(IND vs AUS: Jasprit Bumrah ruled out of fourth Test against Australia)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.